सीबीएसई बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:20 AM2021-07-31T04:20:38+5:302021-07-31T04:20:38+5:30

अकोला : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर बोर्डाने निकाल जाहीर केले ...

Suyash of students in CBSE XII examination | सीबीएसई बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

सीबीएसई बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे सुयश

Next

अकोला : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे यावर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर बोर्डाने निकाल जाहीर केले आहेत. बारावी सीबीएससी बोर्डाचा निकाल गुरुवारी (दि. ३० जुलै) जाहीर झाला असून, अकोला शहरातील तीन सी.बी.एस.ई. शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये प्रभात किड्स स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, बाभूळगाव, स्कूल ऑफ स्कॉलर्स, अकोला या तीनही शाळांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असून, या शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. अत्यंत नियमबद्धरितीने झालेल्या या मूल्यांकनामध्येदेखील अकोल्यातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणवत्तेचे प्रदर्शन केले आहे.

यावर्षी कोविड व लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीने पार पडले. सीबीएसई शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन वर्ग, सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोविड नियमांसह सीबीएसई परीक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते आणि त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षादेखील घेण्यात आल्या होत्या. दरम्यान, कोविड-१९च्या वाढत्या प्रकोपामुळे सीबीएईद्वारे नियोजित परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या; मात्र त्यानंतर सीबीएसईच्या नियमानुसार इयत्ता दहावी, अकरावीच्या गुणांसह यावर्षीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांचे ऑनलाईन पद्धतीने मूल्यांकन करण्यात आले. या सर्वकष मूल्यांकनात अकोल्यातील सी.बी.एस.ई.च्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेचे प्रदर्शन केले आहे.

Web Title: Suyash of students in CBSE XII examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.