शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस, गारपिटीने पळविला तोंडचा घास

By admin | Updated: January 2, 2015 01:37 IST

अकोला जिल्ह्यातील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल.

अकोला: जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तोंडी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पळविल्याने आधीच दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, पातूर, तेल्हारा, बाश्रीटाकळी आणि मूर्तिजापूर या सातही तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. तसेच बाळापूर, पातूर, बाश्रीटाकळी आणि अकोला या चार तालुक्यांमधील ४१ गावांमध्ये गारपीट झाली. गुरुवारीदेखील दिवसभर अवकाळी पाऊस सुरूच होता. दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात जिल्हय़ात तूर, कपाशी, हरभरा, गहू, कांदा, केळी व लिंबू इत्यादी पिकांचे नुकसान झाले. तूर, हरभर्‍याचा फुलोरा गळून पडला, गहू जमिनीवर लोळला असून, कापसाची बोंडं पावसाने भिजून पडली व लिंबू, केळी गळून पडली. हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने, शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पळविला. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीच्या स्थितीत आधीच दुष्काळी दुष्टचक्रात सापडलेला जिल्ह्यातील शेतकरी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीमुळे पुन्हा संकटात सापडला. नापिकीमुळे शेतकर्‍यांना आधीच दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत असतानाच, अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने, दुष्काळात तेरावा महिना, असे म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आल्याचा प्रत्यय येत आहे. शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यात सरासरी ४४.६५ मि.मी. पाऊस!

गेल्या चोवीस तासांत गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंंंंत जिल्ह्यात सरासरी ४४.६५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला ४८.६0, बाश्रीटाकळी ४४, आकोट ३४, तेल्हारा ३४, बाळापूर ७९, पातूर ५५ व मूर्तिजापूर तालुक्यात १८ मि.मी.पाऊस झाला. बाळापूर तालुक्यात अतवृष्टी! गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामध्ये सर्वात जास्त पाऊस बाळापूर तालुक्यात झाला. तालुक्यात ७९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असल्याने, या तालुक्यात अतवृष्टी झाली आहे. सर्वातधिक पाऊस बाळापूरात झाला आहे.