शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत नगरसेवक निवडीचा गुंता सुटता सुटेना!

By admin | Updated: May 26, 2015 02:35 IST

आपसात निर्णय घेण्याचे हायकोर्टाचे मनपाला निर्देश.

अकोला: स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीत महानगर सुधार समितीमधून दोन नगरसेवकांची निवड करण्याऐवजी तत्कालीन महापौर ज्योत्स्ना गवई यांनी एकाच सदस्याची निवड केल्याप्रकरणी भाजप गटने ता हरीश आलिमचंदानी यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. तत्कालीन महानगर सुधार समिती तसेच अकोला विकास आघाडीची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी नसल्याचा दाखला दे त, नागपूर खंडपीठाने या प्रकरणी आपसात निर्णय घेण्याचे निर्देश याचिकाकर्ते तसेच प्रशासनाला दिले आहेत. स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी मनपात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन महानगर सुधार समितीच्यावतीने गटनेता हरीश आलिमचंदानी यांनी प्रतुल हातवळणे, विजय जयपिल्ले यांची नावे सभेच्या पीठासीन अधिकारी ज्योत्स्ना गवई यांना सुचवली. महापौरांनी जयपिल्ले यांच्याऐवजी प्र तुल हातवळणे यांची निवड केली. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपप्रणित महानगर सुधार समि तीमधून दोन सदस्यांची निवड होणे अपेक्षित असल्याचा दावा करीत आलिमचंदानी यांनी नागपूर खंड पीठात याचिका दाखल केली. सदर याचिकेवर २२ एप्रिल २0१५ रोजी बी.पी.धर्माधिकारी, एस.बी.शुकरे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली असता, न्यायालयाने विभागीय आयुक्तांच्या निर्णयाचा दाखला दिला. विभागीय आयुक्तांनी भाजपप्रणित महानगर सुधार समिती तसेच काँग्रेसप्रणित अकोला विकास आघाडीची अधिकृत नोंदणी नसल्याचा निर्वाळा २८ ऑगस्ट २0१२ रोजी दिला होता.