शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: January 6, 2015 01:20 IST

अकोला जि.प.अध्यक्षांच्या दालनात आंदोलनाची घेतली तत्काळ दखल : बोरगाव वैराळेला तातडीने केली शिक्षकाची नियुक्ती.

बोरगाव वैराळे (अकोला ): येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेमध्ये मागील दोन वर्षांंपासून पटसंख्येनुसार शिक्षकांची दोन पदे रिक्त आहेत. येथे सध्या कार्यरत असलेल्या तीन शिक्षकांपैकी एक जण आजारी रजेवर असून, दुसरा प्रशिक्षणाला गेला आहे. परिणामी, मागील १0 दिवसांपासून शाळेतील १५0 विद्यार्थ्यांंना एकच शिक्षक शिकवित असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी यापूर्वीच ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या इशार्‍यानुसार सोमवार, ५ जानेवारी रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई यांच्या दालनात पोहोचून तेथे ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला.या आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश वैराळे, विनायक वैराळे, प्रल्हाद वानखडे, माणिकराव वानखडे, पुरुषोत्तम डोंगरे, विठ्ठल पारिसे, दीपक वैराळे हे प्रामुख्याने सहभागी झाले होते. जोपर्यंंत शिक्षक देणार नाही, तोपर्यंंत ठिय्या आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा आंदोलकांनी पवित्रा घेतल्यामुळे जि.प.अध्यक्ष शरद गवई यांनी शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांना बोलावून बोरगाव वैराळे येथील जि.प.शाळेवर तत्काळ शिक्षक नियुक्त करण्याचे आदेश दिले. यावेळी शिक्षणाधिकारी कचवे यांनी ह्यलोकमतह्ण मधील वृत्ताची दखल घेऊन यापूर्वीच शिक्षक नियुक्त केला असून, सदर शिक्षक बोरगाव वैराळे येथील शाळेवर दुपारी १२ वाजता रुजू झाला असल्याची माहिती दिली. त्याची ऑर्डर दाखविली. त्यामुळे आंदोलन करणार्‍या आंदोलक विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.