शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील विद्यार्थ्यांचा ‘युरेका. युरेका.’

By admin | Updated: December 24, 2014 01:08 IST

पालकापासून अँन्टीऑक्साइडची निर्मिती

राम देशपांडे / अकोला अँल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये वारंवार अन्नपदार्थ शिजविल्यामुळे, मानवी आरोग्यास घातक ठरणारा अँल्युमिनियम ऑक्साइडचा थर तयार होतो. तो पूर्णत: स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या अँन्टीऑक्साइडची निर्मिती अकोल्यातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पालकापासून केली आहे. अँल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये वारंवार अन्नपदार्थ शिजविल्याने रासायनिक अभिक्रिया होऊन, भांड्याच्या आतील भागात अँल्युमिनियम ऑक्साइडचा थर जमा होतो. अन्नातून या रासायनिक पदार्थांचे सेवन झाल्यास, अस्थमा, टीबी, दमा, वातरोग, तोंडाचा अल्सर, अन्ननलिकेतील आजार, तसेच कॅन्सरदेखील होऊ शकतो. म्हणूनच अवघ्या आयुष्यात कोणतेही व्यसन न करणार्‍यांनाही कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे रूग्ण आढळतात.अकोल्यातील डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळेमध्ये इयत्ता नववीत शिकणार्‍या अभिराम कुळकर्णी, मंदार जोशी, ऋषिकेश थोरात, शुभम भटकर या विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्राच्या शिक्षिका रेवती अयाचित-पांडे यांच्या सहाय्याने कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून अँल्युमिनियमच्या भांड्यांच्या स्वच्छतेसाठी उपयुक्त पर्याय शोधला आहे. खराब झालेल्या पालकातून या मुलांनी हरितद्रव्ये एकत्रित केली आणि त्यातून अँल्युमिनियम ऑक्साइड नष्ट करणार्‍या अँन्टीऑक्साइडची निर्मिती केली. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेविना पालकापासून तयार केलेली ही भूकटी अँल्युमिनियमची भांडी स्वच्छ करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. निशू नर्सरी-कोठारी कॉन्व्हेंटमध्ये पार पडलेल्या ह्यइंटिग्रेटेड सायन्सह्ण या विज्ञान मेळाव्यात या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.