पिसाळलेल्या जंगली डुकराचा शेतकरी, मजुरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:59 AM2021-01-08T04:59:02+5:302021-01-08T04:59:02+5:30

पणज : पिसाळलेल्या जंगली डुकराने शेतात कामासाठी जात असलेल्या शेतकरी, मजुरावर हल्ला केल्याची घटना ७ जानेवारी राेजी सकाळी ८.३० ...

A stray wild boar farmer, attacked by a laborer | पिसाळलेल्या जंगली डुकराचा शेतकरी, मजुरावर हल्ला

पिसाळलेल्या जंगली डुकराचा शेतकरी, मजुरावर हल्ला

Next

पणज : पिसाळलेल्या जंगली डुकराने शेतात कामासाठी जात असलेल्या शेतकरी, मजुरावर हल्ला केल्याची घटना ७ जानेवारी राेजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास पणज येथून जवळच असलेल्या नरसिंगपूर शिवारात घडली. या हल्ल्यात संजय आवंडकार (वय ४८) व शेतमजूर अशोकराव काळबाग (वय ५५) हे दाेन शेतकरी, शेतमजूर गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर पिसाळलेल्या जंगली डुकराने हल्ला चढवल्याने या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. अनेक दिवसांपासून पणज, नरसिंगपुरा, बाेचरा, शहापूर, वाघाेडा, गाैरखेड, धामणगाव परिसरात वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. अनेक शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतात जावे लागते. तरी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: A stray wild boar farmer, attacked by a laborer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.