रेल्वे दरवाढीविरुद्ध कॉँग्रेसचे अकोल्यात रेल रोको

By Admin | Updated: June 26, 2014 02:06 IST2014-06-26T02:00:43+5:302014-06-26T02:06:53+5:30

रेल्वे भाडेवाढीविरोधात कॉँग्रेसने बुधवारी ‘रेल रोको’ आंदोलन केले.

Stop the railways in the Akoliat of the Congress against the railway hike | रेल्वे दरवाढीविरुद्ध कॉँग्रेसचे अकोल्यात रेल रोको

रेल्वे दरवाढीविरुद्ध कॉँग्रेसचे अकोल्यात रेल रोको

अकोला- रेल्वे भाडेवाढीविरोधात कॉँग्रेसने बुधवारी ह्यरेल रोकोह्ण आंदोलन केले. आंदोलनात केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने भरमसाठ रेल्वे भाडेवाढ करून प्रवाशांचा खिसा कापला आहे, असा आरोप कॉँग्रेसने केला आहे. या भाडेवाढीचा निषेध करण्यासाठी बुधवारी सकाळी कॉँग्रेसतर्फे रेल्वे स्थानकावर आंदोलन केले. कॉँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सिकंदराबाद-बिकानेर एक्स्प्रेस रोखली. आंदोलनात कॉँग्रेसचे महानगराध्यक्ष मदन भरगड, महिला आघाडीच्या नेत्या स्वाती देशमुख, नितीन ताकवाले यांच्यासह कायकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Stop the railways in the Akoliat of the Congress against the railway hike