भरधाव टीप्पर उलटला; सात जखमी

By Admin | Updated: June 17, 2014 20:48 IST2014-06-17T19:49:38+5:302014-06-17T20:48:47+5:30

वाळूची वाहतूक करणारा एक टीप्पर उलटून चालकासह सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली.

Stiffness overturned; Seven injured | भरधाव टीप्पर उलटला; सात जखमी

भरधाव टीप्पर उलटला; सात जखमी

वल्लभनगर: वाळूची वाहतूक करणारा एक टीप्पर उलटून चालकासह सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना अकोला-आकोट मार्गावर कासली फाटा ते उगवा फाटा दरम्यान मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनूसार, वाळूने भरलेला एम. एच. ३० ई. ५१८९ क्रमांकाचा टीप्पर अकोल्याकडे जात होता. तेवढ्यात मागून येणार्‍या एका दुसर्‍या टिप्परने कावा मारला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अचानक टिप्पर उलटला. यावेळी ट्रॉलीत बसलेले पाच मजूर वाळूखाली दबले. तर कॅबीनमधील चालक व क्लिनर बाजूला फेकल्या गेले. यात एका मजुराचा पाय मोडला व इतर मजूर गंभीर जखमी झाले. घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी त्यांना बाहेर काढले. जखमींमध्ये चालक विलास मांगीलाल चव्हाण (रा. काजळेश्वर), उमेश रमेश शिरसाट, नितीन भिमराव धसाळे, दिपक भिमराव धसाळे, मोहन विठ्ठलराव गोपनारायण, रुपेश शामराव वानखडे, अनिल राजाराम ताजने (सर्व रा. मलकापूर) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच आकोट फैल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारार्थ अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी आकोट फैल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

Web Title: Stiffness overturned; Seven injured