शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी पुन्हा खासगीकरणाकडे

By admin | Updated: November 29, 2014 23:01 IST

ट्रॅव्हल्स कंपन्यांना मागीतल्या सूचना : टप्पा वाहतुकीला मिळणार परवानगी.

बुलडाणा : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्याच्या वाहनांना टप्पा वाहतूक करण्याची परवानगी केंद्र शासनाकडून लवकरच मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यासाठी केंद्र शासनाने राज्यातील सर्व वाहतूकदारांना सूचनाही मागविल्या आहेत. असे झाल्यास गावखेड्यापासून डोंगर-दर्‍यातून धावणारी एसटी रस्त्यावरून गायब होणार आहे. त्याचा राज्य परिवहन महामंडळाबरोबरच सामान्य जनतेला मोठा फटका बसणार आहे. सध्या सर्वत्र खासगीकरणाचे वारे वाहात असताना आता खासगीकरणाचा बळी एसटी महामंडळ ठरणार आहे. असे झाल्यास एसटीचे हजारो कामगार व कर्मचारी देशाधडीला लागणार आहेत. इलेक्ट्रॉनिक, इंटरनेटच्या आजच्या युगात सर्वांनीच बदल स्वीकारला आहे; मात्र प्रवासी वाहतुकीच्या क्षेत्रात एसटीचे नव्या बदलाकडे पाठ फिरवून तेच परंपरागत धोरण कायम ठेवले आहे. प्रवाशांना काय हवे, काय नको, याची जाणीव न ठेवता वर्षानुवर्षे त्याच गतीने आणि भूमिकेने एसटी वाटचाल करीत आहे. त्याचा परिणाम म्हणजे एसटी महामंडळाची प्रवासी संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहे. दुसरीकडे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा पुरविणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या नव-नवे प्रयोग करीत आहेत, त्यामुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत आहेत. सिझनचा काळ वगळता एसटीचे प्रवासभाडे नेहमीच खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला प्राधान्य देत आहेत. त्यातच एसटीची स्पिड लॉक पद्धती, कर्मचार्‍यांना लागणार्‍या सुविधा, अवाजवी राजकीय हस्तक्षेप आणि अंतर्गत राजकारण यातच एसटी महामंडळ धन्यता मानत असल्याने बदल स्वीकारण्यामध्ये एसटी कमी पडत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी, हे ब्रीद घेऊन एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक सुरू केली; परंतु बदलत्या काळानुसार एसटीला आपल्या धोरणात बदल करणे शक्य झाले नाही. या कारणामुळे एसटीचे प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत असून, आजच्या स्पर्धेच्या युगातही एसटी महामंडळाची कासवगतीने वाटचाल सुरू आहे.