शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत साहित्य चोरट्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास

By admin | Updated: May 16, 2015 00:42 IST

सबळ पुराव्याअभावी ४ जणांची सुटका.

अकोला - माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून विद्युत साहित्य चोरणार्‍या चोरट्यास शुक्रवारी एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच ५ हजार रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य पाच जणांची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. चपराशीपुरा अमरावती येथील रहिवासी इफ्तेखार खान जाकीर खान याने माना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महावितरण कंपनीच्या हायटेंशनच्या कामासाठी वापरण्यात येणारे ४३ लोखंडी अँगल २५ फेब्रुवारी २0१२ च्या पूर्वी चोरी केले होते. हे अँगल चोरी केल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. या प्रकरणी महावितरण कंपनीच्या तक्रारीवरून माना पोलिसांनी इफ्तेखार खान जाकीर खान याच्यासह श्यामसुंदर पांडे, जकीरुद्दीन बदरुद्दीन, अजमत खान बिस्मिल्ला खान व सै. अफसर सै. जलील या पाच जणांविरुद्ध इलेक्ट्रिसिटी अँक्टच्या कलम १३६ नुसार गुन्हा दाखल केला होता. इफ्तेखार खान जवळून १२ अँगल जप्त करून प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एस.जी. देशपांडे यांच्या न्यायालयात शुक्रवारी झाली असून, त्यांच्या न्यायालयाने इफ्तेखार खान जाकीर खानला सहा महिन्यांचा सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास आणखी एका महिन्याची शिक्षा न्यायालयाने इफ्तेखार खान जाकीर खान याला सुनावली. या प्रकरणातील इतर चार आरो पींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड. मो. परवेज यांनी कामकाज पाहिले.