फटाका फाेडल्याचे कारणावरून बहीण-भावाने केली शेजारच्या इसमाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:22 IST2021-09-24T04:22:33+5:302021-09-24T04:22:33+5:30

माेठी उमरी परिसरात असलेल्या ताथाेडनगर येथील रहिवासी सुनील लक्ष्मण गवई वय ४२ वर्षे यांनी ११ सप्टेंबर राेजी रात्री १० ...

Sister-in-law kills neighbor Isma over firecrackers | फटाका फाेडल्याचे कारणावरून बहीण-भावाने केली शेजारच्या इसमाची हत्या

फटाका फाेडल्याचे कारणावरून बहीण-भावाने केली शेजारच्या इसमाची हत्या

माेठी उमरी परिसरात असलेल्या ताथाेडनगर येथील रहिवासी सुनील लक्ष्मण गवई वय ४२ वर्षे यांनी ११ सप्टेंबर राेजी रात्री १० वाजताच्या सुमारास त्यांच्या घराच्या अंगणात बसवलेल्या गणपतीसमाेर फटाका फाेडला हाेता़ याच कारणावरून त्यांचेच शेजारी असलेले वृंदन विष्णू जाधव व त्याची बहीण सकू विष्णू जाधव यांनी दाेघांनी लाेखंडी पाइपने सुनील गवई यांना बेदम मारहाण केली़ त्यानंतर गवई जमिनीवर काेसळताच या दाेघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करीत लाेटपाट केली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुनील गवई यांना तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात दाखल केले़ मात्र, येथील सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले़ गवई यांच्यावर उपचार सुरू असतानाच तीन दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पाेलिसांनी सुरुवातीला भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला हाेता़ मात्र गवई यांचा मृत्यू झाल्यानंतर वृंदन जाधव व त्याची बहीण सकू जाधव या दाेघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला़ यासाेबतच ॲट्राॅसिटी ॲक्ट अन्वयेही गुन्हा दाखल काण्यात आला आहे़ या प्रकरणातील आराेपी बहीण- भाऊ फरार असून पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत़

आराेपींचा पथकाकडून शाेध

सुनील गवई यांची हत्या करणाऱ्या वृंदन जाधव व त्याची बहीण सकू जाधव हे दाेघेही फरार झाले असून, पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत़ या दाेघांच्या शाेधासाठी पाेलिसांनी पथकांचे गठन केले असून, त्यांचा विविध जिल्ह्यांत शाेध घेण्यात येत आहे़ नागपूर परिसरातही पथकाकडून या दाेन्ही फरार आराेपींना शाेधण्यात येत आहे़

Web Title: Sister-in-law kills neighbor Isma over firecrackers