शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषदेच्या संचालक, सल्लागारांना ‘शो-कॉज’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 2:19 PM

राज्यपालांनी महाराष्ट्र  कृ षी शिक्षण संशोधन परिषद पुण्याचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर व सल्लागार (वित्त) गणेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अकोला : राज्यातील चारही कृ षी विद्यापीठांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती निधी देण्याबाबत तसेच शिष्यवृत्ती वितरित करण्यासंदर्भात महाराष्ट्र  कृ षी शिक्षण व संशोधन परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्याचे स्पष्ट झाले आहे. याची गंभीर दखल घेत राज्यपालांनी महाराष्ट्र  कृ षी शिक्षण संशोधन परिषद पुण्याचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर व सल्लागार (वित्त) गणेश पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.राज्यातील चारही कृ षी विद्यापीठांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क परत मिळाले नाही. शिष्यवृत्तीही वाटप झाली नाही. यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वास्तविक २०१८-१९ पर्यंत चारही कृ षी विद्यापीठांकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. १२ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार, हा निधी विद्यार्थ्यांना वितरित करणे अपेक्षित होते. हा निधी महाराष्ट्र ‘डीबीटी’प्रणालीचे ‘बीईएएमएस’ या प्रणालीशी एकात्मिकीकरण करणे गरजेचे होते; मात्र यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात महाराष्ट्र  कृ षी शिक्षण संशोधन परिषद पुण्याचे संचालक (शिक्षण) डॉ. हरिहर कौसडीकर व गणेश पाटील सल्लागार (वित्त) यांनी या कामांमध्ये हलगर्जी केली. त्यामुळे राज्यातील हजारो पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले. याची गंभीर दखल घेत राज्यपालांच्यावतीने कृ षी पशुसंवर्धन विभागाच्या उपसचिवांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाºयांना १० दिवसांत खुलासा सादर करण्याचे बजावण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला