शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे तळ्य़ात-मळ्य़ात

By admin | Updated: August 29, 2015 01:11 IST

नगरसेवक वा-यावर; पदाधिका-यांचा ताळमेळ नाही!

अकोला: महापालिकेसह राज्यात सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेला कणखर भूमिकेचा विसर पडला की काय, अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. एकीकडे सभागृहात सिमेंट रस्त्यांना विरोध दर्शविणार्‍या शिवसेनेने आता १२ दुकानांच्या प्रकरणात भाजपच्या विरोधात बाह्या वर खोचल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या मनमानीला विरोध करणार्‍या सेना नगरसेवकांवर प्रशासनाकडून गुन्हे दाखल झाल्यानंतरही पदाधिकार्‍यांनी बघ्याची भूमिका घेतली. पक्षाच्या विसंगत भूमिकेमुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, ही खदखद कोणत्याही क्षणी उफाळून बाहेर येण्याचे संकेत आहेत. केंद्रासह राज्यात सत्ता असतानादेखील महापालिकेत सेना-भाजपची मने दुभंगल्याचे चित्र सतत समोर येत आहे. सत्तापक्षातील दुफळीचा फायदा विरोधकांपेक्षा अधिकारीच जास्त घेत आहेत. सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेत प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला साडेबारा टक्के आगाऊ रक्कम मंजूर केलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करीत १६ जुलैच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या गटनेत्या मंजूषा शेळके यांनी विरोध दर्शविला. अर्थातच ही पक्षाची भूमिका असतानासुद्धा उपमहापौर विनोद मापारी यांनी चुप्पी साधणे पसंत केले. सेनेचा विरोध धुडकावून लावत भाजपने सिमेंट रस्त्यांच्या निविदेला मंजुरी दिली. आता खुले नाट्यगृहानजीकच्या १२ दुकानांना मंजुरी देण्यासाठी भाजपने अनुकूलता दर्शवली असून, हा विषय २ सप्टेंबर रोजी आयोजित विशेष सभेत मांडल्या जाणार आहे. या विषयाला विरोध करण्यावर शिवसेनेत काथ्याकुट सुरू आहे. एकूणच, शहराच्या निर्णय प्रक्रियेत ठोस निर्णय घेण्याऐवजी सेनेचे तळ्य़ात-मळ्य़ात सुरू असतानाच स्वपक्षीय नगरसेवकांच्या बाबतीतही पक्षाची भूमिका कचखाऊ असल्याचे नुकतेच दिसून आले. नागरिकांच्या सुविधेसाठी प्रभागात नालीचे बांधकाम करणारे नगरसेवक पंकज गावंडे नियमबाह्य बांधकाम करीत असल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात प्रभारी उपायुक्त माधुरी मडावी यांनी पोलिसात तक्रार केली. या प्रकरणी गावंडे आणि पावसाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या मुद्यावर प्रशासनाला जाब विचारणे शिवसेनेकडून अपेक्षित होते. तसे न करता, पदाधिकार्‍यांनी तोंडाला कुलूप लावणे पसंत केले. एकूणच, शिवसेनेत पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये कवडीचाही ताळमेळ राहिला नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे, हे तेवढेच खरे.