शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

‘रायगडा’वर अवतरली शिवशाही; डाबकी रोड शिवरायाच्या जयघोषाने निनादला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:13 AM

अकोला : ढोल-ताशांचा गजर... तुतारीचा निनाद... आकाशात भिरभिरणाºया भगव्या पताका... जय जिजाऊ जय शिवराय! जय भवानी... जय शिवराय...चा आसमंतात निनादणारा जयघोष अन् ढोल-ताशे, दिंडी अन् गोंधळ, संबळाच्या तालावर थिरकणारे शिवरायांचे मावळे... हे चित्र पाहून, डाबकी रोडवरील रेणुका नगरात साकारलेल्या रायगडावर जणू शिवशाहीच अवतरल्याचे भासत होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डाबकी रोडवर जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने रविवारी जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. 

ठळक मुद्देबाभळेश्वर मंडळाचा शिवजयंती उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ढोल-ताशांचा गजर... तुतारीचा निनाद... आकाशात भिरभिरणाºया भगव्या पताका... जय जिजाऊ जय शिवराय! जय भवानी... जय शिवराय...चा आसमंतात निनादणारा जयघोष अन् ढोल-ताशे, दिंडी अन् गोंधळ, संबळाच्या तालावर थिरकणारे शिवरायांचे मावळे... हे चित्र पाहून, डाबकी रोडवरील रेणुका नगरात साकारलेल्या रायगडावर जणू शिवशाहीच अवतरल्याचे भासत होते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त डाबकी रोडवर जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने रविवारी जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. मंडळाने साकारलेल्या भव्य दिव्य आणि देखण्या रायगडाच्या प्रतिकृतीवर शिवरायांच्या पुतळ्याला मानाचा मुजरा करून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली. रेणुका नगरातील जय बाभळेश्वर मंडळाच्यावतीने साकारलेला रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रायगडाच्या परिसरात १00 फूट शिवरायांची प्रतिमा, अश्वारूढ छत्रपती शिवराय स्मारकाची प्रतिकृती आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे शिवराज्याभिषेकाच्या प्रतिकृतीही मन मोहून टाकणाºया होत्या. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोपीकिसन बाजोरिया, उपमहापौर वैशाली शेळके, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, मनपा सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, पोलीस अधीक्षक राकेशकुमार कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील, परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक राहुल धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, ‘लोकमत’चे निवासी संपादक रवी टाले, ‘लोकमत’चे उप महाव्यवस्थापक रमेश डेडवाल, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजानन पावसाळे, मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले, माजी महापौर सुमनताई गावंडे, नगरसेवक अनिल गरड, माजी नगरसेवक विलास शेळके, नगरसेवक सुनील क्षीरसागर, तुषार भिरड, शीतल गायकवाड, योगिता पावसाळे, आरती घोगलिया, रंजना विंचनकर, नंदा पाटील, सारिका जयस्वाल, पराग कांबळे, काँग्रेसचे जिल्हा महासचिव राजेश भारती आदी मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यात योगदान देणारे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, सर्पमित्र बाळ काळणे, रायगडाची सजावट करणारे राजेशआप्पा टेवरे यांचा कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, उपमहापौर वैशाली शेळके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व शाल देऊन हृद्य सत्कार करण्यात आला. रेणुका नगरात साकारलेल्या रायगड किल्ल्यापासून शिवरायांच्या भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला. शिवाजी नगरातील संत गाडगेबाबा आखाडा येथे शोभायात्रेचा समारोप झाला.

शिवरायांचे विचार कृतीत आणा- कृषिमंत्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली.  शिवरायांचे विचार प्रेरणादायी आहेत. हे विचार खºया अर्थाने कृतीत आणले तर समाजात फार मोठा बदल घडून येईल, असे  मत राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी व्यक्त केले. बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात ते बोलत होते. शिवरायांनी सदैव रयतेचे, शेतकºयांच्या कल्याणासाठी कार्य केले. म्हणूनच ते श्रीमंतयोगी ठरले. असे सांगत, ना. फुंडकर यांनी जय बाभळेश्वर मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी मंडळाच्यावतीने ना. फुंडकर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. 

 

बाभळेश्वर मंडळातर्फे गरजूंना मदतीचा हातबाभळेश्वर मंडळाच्यावतीने एक सामाजिक जबाबदारी म्हणून गरीब, गरजूंना आर्थिक मदतीचा हात दिला. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते माता नगरात लागलेल्या आगीत घर जळालेल्या अश्विनी डोंगरे हिला आणि लग्नासाठी मेघा दादाराव मानकर हिला, आनंदाश्रमाला प्रत्येकी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. 

 

मान्यवरांचा हृद्य सत्कार जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, पोलीस अधीक्षक राकेशकुमार कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील, ‘लोकमत’चे उप महाव्यवस्थापक रमेश डेडवाल आदींचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

 

 

शोभायात्रेतील वेशभूषांनी वेधले लक्षजय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये ऐतिहासिक व पौराणिक वेशभूषा बालगोपालांनी साकारल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज, बालशिवाजी, राजमाता जिजाऊ मासाहेब, झाशीची राणी, भारतमाता, जेजुरीचा खंडेराय आदी वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. जिजाऊ मासाहेब यांची वेशभूषा अपेक्षा पेठकर हिने साकारली होती. भारत माता- नेहा पवार, झांशीची राणी-रेणुका शेळके, जेजुरीचा खंडेराय-संजय भडंगे, जिजाऊ-वैष्णवी खरसाळे, बालशिवाजी- विधी खरसाळे, अर्पित शिवणेकर, ओंकार मुंगीकर आदींच्या वेशभूषा आकर्षक ठरल्या.  

टॅग्स :AkolaअकोलाShivjayantiशिवजयंती