‘रायगड पूर्वी कसा होता?’तून जिवंत झाला किल्ल्याचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 03:21 PM2017-10-18T15:21:57+5:302017-10-18T15:32:17+5:30

इतिहास प्रेमी मंडळच्या वतीने ‘रायगड पूर्वी कसा होता?’ या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साउंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिंवत केला.

How did Raigad first survive? | ‘रायगड पूर्वी कसा होता?’तून जिवंत झाला किल्ल्याचा इतिहास

‘रायगड पूर्वी कसा होता?’तून जिवंत झाला किल्ल्याचा इतिहास

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्राचा इतिहास हा बखरीच्या पानात नसून तो गडकिल्ल्यात आहे : रामचंद्र देखणे रायगडाची प्रतिकृती आणि लाईट साउंड शो करणार्‍या विद्याथ्यार्चां देखणे यांच्या हस्ते सत्कार

पुण : महाराष्ट्रातील गडकिल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे वैभव आहे. महाराष्ट्राचा इतिहास हा भूगोल बदलवणारा इतिहास आहे. प्रत्येक माणसामध्ये चेतना पेटवणारा इतिहास आहे़ महाराष्ट्राचा इतिहास हा बखरीच्या पानात नसून तो गडकिल्ल्यात आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. 
इतिहास प्रेमी मंडळच्या वतीने ‘रायगड पूर्वी कसा होता?’ या विषयावरील प्रदर्शनातून रायगड किल्ल्याचा इतिहास लाईट आणि साउंडच्या माध्यमातून पुणेकरांसमोर जिंवत केला. यावेळी व्यासपीठावर शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, प्रा. मोहन शेटे सर उपस्थित होते. यावेळी ३२ मिनिटात लिंगाणा किल्ला सर करणारे अनिल वाघ आणि आग्रा ते राजगड पायी प्रवास करणारे व ५ वर्षात ५१४ किल्ले चढणारे मारुती गोले यांना साहसवीर पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.
देखणे म्हणाले, परमार्थ आणि पुरुषार्थ यांचा समन्वय असणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये भक्तीचा आणि शक्तीचा अनोखा संगम झाला आहे. कधी कधी वेडी माणसेच समाजाच्या भल्यासाठी शहाणपणाचे  काम करतात. महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक सजीवाला प्रेरणा देणारा इतिहास आहे़ कदम म्हणाले, इतिहास प्रेमी मंडळ सातत्याने नवनवे उपक्रम राबवित असते. यावेळी राबवलेला प्रयोग हा अत्यंत वेगळा आणि अभिमानास्पद आहे. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे पाच एकर जागेमध्ये रायगडाची प्रतिकृती तयार करणार आहे़ नर्‍हे-आंबेगावला ३०० कोटी रुपये खर्चून सुसज्ज अशी शिवसृष्टी व संस्कार केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी  सांगितले. 
पुरस्काराला उत्तर देताना मारुती गोले म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी प्रेरणा आहे. या पुरस्काराने मला आणखी ऊर्जा दिली आहे. अनिल वाघ म्हणाले, माझ्या जीवनातील आदर्श हे तानाजी मालुसरे आहेत़ लिंगाणा चढताना मी तानाजी मालुसरे यांचे स्मरण करत होतो. भविष्यामध्ये सायकलने किल्ले चढण्याची मोहीम आखणार आहे़  मोहीम आखणार आहे. यावेळी रायगडाची प्रतिकृती आणि लाईट साउंड शो करणार्‍या विद्याथ्यार्चांही देखणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मोहन शेटे यांनी प्रास्ताविक केले व प्रणव जोशी यांनी आभार मानले.

Web Title: How did Raigad first survive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.