प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कुंभारी अंतर्गत कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, याकरिता दोन बुथ तयार करण्यात आले. यामध्ये कुंभारीस्थित प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच कैलास नगर कुंभारी अशा पध्दतीने पोलिओ बुथचे नियोजन करण्यात आले होते. कुंभारीचे महात्मा फुले स्काउट पथकाने दोन्हीही पोलिओ बुथवर श्रमदान करून राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. यामध्ये सर्वप्रथम गावातून पल्स पोलिओ जनजागृती रॅली काढण्यात आली. आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्र कुंभारीच्या प्रमुख डॉ. रश्मी चव्हाण यांच्या नियोजनात अनिता घुले, आशीष देवळे, शिवमाला मोरखडे, पूनम अवचार, आशा स्वयंसेविका मीरा साबळे, अल्का नागे अंगणवाडी सेविका अन्नपूर्णा ढोके, प्रतिभा तायडे इत्यादीं प्रामुख्याने उपस्थित होत्या. पोलिओमुक्त अभियान राबविण्यासाठी विद्यालयाचे स्काउट मास्टर बी.एस. तायडे स्काउट ऋषिकेश पांडे, वेदान्त पायघन, ओम साठे, सुनील बाकोडिया, यश वानखडे, विश्वराज भातकुले, तिलक लाकडे, विशाल बुंदिले, वैभव साळुंके, पंकज उमाळे, विजय गवई, आनंद अंभोरे यांनी सहकार्य केले.
फोटो