शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार शिजविणारे अडचणीत

By admin | Updated: May 21, 2015 01:43 IST

राज्यात पाच लाख कर्मचारी; थकीत मानधनासाठी आंदोलनाचा इशारा

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा :आधीच महागाई, त्यात अत्यल्प मानधन आणि तेही वेळेवर मिळत नसल्याने शालेय पोषण आहार शिजविणार्‍यांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्यात अशीच परिस्थिती कमी-जास्त प्रमाणात सर्वत्र आहे. त्यामुळे शासनाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. शासनाने यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्येही विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजविण्याचे काम मदतनीस आणि स्वयंपाकी करीत आहेत. त्यांना केवळ एक ते दोन हजार रुपये मानधन दिले जाते. तेही वेळेवर मिळत नसल्याने मानधनावरील या कर्मचार्‍यांची उपासमार होत आहे. सध्या चार महिन्यांचे मानधन शासनाकडे थकले आहे. हे थकलेले मानधन त्वरित मिळावे, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी केली आहे. *असे मिळते कर्मचा-यांना मानधन शासननिर्णय २0११ नुसार २५ विद्यार्थ्यांमागे खिचडी शिजविणार्‍या कर्मचार्‍याला एक हजार रुपये दरमहा मानधन म्हणजे दिवसाला फक्त ३३ रुपये रोज पडतो. यात केंद्र सरकारचा ७५0 रुपये आणि राज्य सरकारचा २५0 रुपये वाटा आहे. २५ ते २00 विद्यार्थ्यांपर्यंत दोन हजार रुपये मानधन दिले जाते. राज्यात सन २0१४-१५ मध्ये २ लाख ७३ हजार कर्मचारी कार्यरत होते. दरम्यान, शासनाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश दिल्यामुळे त्यांची संख्या जवळपास पाच लाख झाली असून, तुटपुंज्या मानधनावर काम करणारे कर्मचारीन्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. *बुलडाणा जिल्ह्यात ४00 कर्मचारी बुलडाणा जिलत पोषण आहार शिजविणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या ४00 आहे. त्यांना मागील मार्च, एप्रिल आणि चालू मे महिन्याचे मानधन त्वरित द्यावे, अशी मागणी शालेय पोषण आहार शिजविणार्‍यांची जनहित कल्याणकारी संघटनेने केली आहे. दरम्यान, मानधन न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पवनकार, संस्थापक अध्यक्ष अरुण पाटील, सचिव संतोष भागवत यांनी दिला.