शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

खिचडीत किडे

By admin | Updated: August 4, 2014 00:12 IST

दहीगाव : शाळा मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस

नांदुरा: तालुक्यातील ग्राम दहीगाव येथील गाडगे महाराज विद्यालयाला केंद्रप्रमुख हिवाळे यांनी ३0 जुलै रोजी भेट देवून पाहणी केली असता खिचडीमध्ये सोंडे, किटक आढळून आले. याप्रकरणी केंद्र प्रमुखाच्या अहवालावरून गटशिक्षण अधिकारी पडोळ यांनी गाडगे महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबत सविस्तर असे की, नांदुरा येथून अगदी जवळच असलेल्या ग्राम दहीगाव येथे गाडगे महाराज विद्यालयात जिल्हा परिषद केंद्रीय शाळा खुमगावचे केंद्रप्रमुख यांनी ३0 जुलै रोजी शाळेला भेट दिली. केंद्रप्रमुखांनी पोषण आहाराची तपासणी केली असता शिजवून आणलेल्या खिचडीमध्ये सोंडे व किटक आढळून आले. विशेष म्हणजे केंद्रप्रमुख यांनी वारंवार मागणी करूनही मागील वर्षाचे तसेच सध्याचे अभिलेखे तपासणी करीता उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. स्टॉकबुक माहे मार्च २0१४ पासून अपूर्ण असल्याचे निदर्शनात आले आहे. शाळा स्तरावर ठेवण्यात येणारे अभिलेखे अपूर्ण असणे, सनियंत्रण समितीची स्थापना न करणे, शिक्षक पालक संघ स्थापन न करणे, अन्न शिजवणार्‍या यंत्रणेबाबत आवश्यक ती सर्व कार्यालयीन प्रक्रिया पुर्ण न करणे जसे करारनामा वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नाही . या प्रकरणी केंद्रप्रमुखांनी गटशिक्षणाधिकार्‍यांना दिलेल्या अहवालावरून मुख्याध्यापकांना वरील सर्व त्रुटीबाबतचा खुलासा सात दिवसाच्या आत सादर करावा, अन्यथा प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल, अशी नोटीस देण्यात आली आहे.