तीन गोवंशांना जीवदान; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:20 IST2021-07-31T04:20:41+5:302021-07-31T04:20:41+5:30

कुरुम : मूर्तिजापूर तालुक्यातील पो.स्टे. माना कार्यक्षेत्रातील शेलू फाटा-शेलू बाजार रोडवर कत्तलीसाठी वाहनात कोंबून घेऊन जाणाऱ्या गोवंशांना माना पोलिसांनी ...

Saving the lives of three cows; 5 lakh 60 thousand items confiscated | तीन गोवंशांना जीवदान; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

तीन गोवंशांना जीवदान; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

कुरुम : मूर्तिजापूर तालुक्यातील पो.स्टे. माना कार्यक्षेत्रातील शेलू फाटा-शेलू बाजार रोडवर कत्तलीसाठी वाहनात कोंबून घेऊन जाणाऱ्या गोवंशांना माना पोलिसांनी जीवदान देऊन ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना शुक्रवारी घडली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शेलू फाटा-शेलू बाजार रोडवर माना पोलिसांनी नाकाबंदी करून यादरम्यान अमरावतीवरून येणाऱ्या एका मालवाहू वाहनात अप क्र. (एमएचए बी ४९७९) या वाहनाची झाडाझडती घेतली असता त्यात ३ गोवंश कोंबून बांधलेले निदर्शनास आले. या वेळी वाहनचालकाची चौकशी केली असता गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या आरोपी मो. तौसिफ मो. शफी (२६, रा. माना) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन तीन गोवंश किंमत ६० हजार रुपये, मालवाहू वाहन किंमत ५ लाख रुपये असा एकूण ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी मो. तौसिफ मो. शफी यास अटक करण्यात आली. ही कारवाई पो.स्टे. माना ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. घनश्याम पाटील, हे.कॉ. देवानंद दंदी, पो.कॉ. सचिन दुबे, वैभव येळणे, जयकुमार मंडावरे, चालक प्रवीण ठाकरे यांनी केली.

Web Title: Saving the lives of three cows; 5 lakh 60 thousand items confiscated