शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली अकोला नगरी

By admin | Updated: May 15, 2015 01:37 IST

छावाच्या शोभायात्रेत पारंपरिकतेला महत्त्व.

अकोला : संभाजी महाराज जयंतीनिमित्त छावा संघटनेतर्फे गुरुवारी शहरातून मोठय़ा उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. संभाजी महाराजांच्या जयघोषाने टाळ मृदंगासोबतच आदिवासी नृत्य व लेझीम या सारख्या पारंपरिक देखावे शोभायात्रेत सादर करण्यात आले. गुरुवारी संभाजी महाराजांच्या जयघोषाने अकोला नगरी दुमदुमली होती. शिवाजी पार्क येथून काढण्यात आलेल्या शोभायात्रेचा शुभारंभ डॉ. गजानन नारे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, शिवाजी पार्कस्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, छावा संघटेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शोभायात्रेत यावेळी मनोहर गिरी यांनी संभाजी महाराजांची वेशभूषा धारण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत ढोल ताशांसोबतच चार वारकरी मंडळांचा समावेश होता. तसेच पाच आखाडे, तिन लेझीम पथक व दहा देखाव्यांचा समावेश होता. यावेळी सहभागी मंडळांनी पिंजर्‍यातील वाघोबाचे नृत्य, लाठीकाठी, मानेतून व पोटातून तलवार घातलेला पुरुष, मल्लखांब प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसचे यावेळी सादर करण्यात आलेल्या बंजारा व आदिवासी समाजाच्या पारंपरिक नृत्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शिवाजी पार्क येथून निघालेली ही शोभायात्रा अब्दुलहमीद चौक, मानेक टॉकीज, जुना कापड बाजार चौक, टिळक रोड मार्गे शहर कोतवाली चौकात पोहोचली. दरम्यान, ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. तसेच शीतपेयाचे वितरण करण्यात आले.