शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाउन झाल्याने स्टेट बँकेचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: February 18, 2017 03:29 IST

तीन दिवसांपासून ग्राहक त्रस्त

संजय खांडेकरअकोला, दि. १७-जिल्ह्यातील सर्वात मोठी बँक म्हणून गणल्या जाणार्‍या भारतीय स्टेट बँकेचे सर्व्हर गत तीन दिवसांपासून डाउन असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा मनस्ताप अकोल्यातील हजारो ग्राहकांना सोसावा लागत असून, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारीदेखील या प्रकाराने वैतागले आहेत.स्थानिक टावर चौकातील भारतीय स्टेट बँकेतून दररोज जवळपास एक कोटीची उलाढाल होते. मात्र, बुधवारी सकाळपासून बँकेत येणार्‍या ग्राहकांना रक्कम मिळत नसल्याने ओरड सुरू झाली आहे. काही ग्राहकांची रक्कम ट्रान्सफर झालेली नाही, धनादेश वटविले गेले नाही, अनेक ग्राहकांच्या रकमाचा ताळमेळ चुकला. अशा तक्रारी घेऊन ग्राहक येथील मुख्य व्यवस्थापकांकडे धाव घेत आहेत. गत तीन दिवसांपासून सर्व्हर डाउन असल्याची सूचना बँकेचे अधिकारी उद्घोषक कक्षातून दररोज देत असले, तरी त्यावर बँकेकडून उपाययोजना मात्र आजपावेतो करण्यात आलेले नाही. त्यामुळे दररोज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती शुक्रवारीदेखील कायम होती.याबाबत माहिती घेतली असता, सेवानवृत्त अधिकारी-कर्मचारी, ईपीएफचे कर्मचारी आणि शासन सेवेतील विद्यमान अधिकारी-कर्मचारी अशा जवळपास ६0 हजार ग्राहकांचे वेतन स्टेट बँकेत दरमहा जमा होते. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत स्टेट बँकेत प्रचंड गर्दी असते. एटीएममधून आणि थेट खात्यातून रक्कम काढणार्‍यांची एकच गर्दी होत असल्याने सर्व्हरवर लोड येतो. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात ही समस्या स्टेट बँकेत उद्भवते. दहा वर्षांआधी स्टेट बँकेत २५१ कर्मचारी होते. बँकेचे व्यवहार संगणकीय झाले असून आता बँकेत आज केवळ ५२ कर्मचारी कार्यरत आहेत. बँक क्षेत्रातील व्याप आणि अद्ययावत स्वरूपाचा विस्तार वाढत असल्याच्या तुलनेत कर्मचार्‍यांची संख्या कमी पडत आहे. त्याचा त्रास ग्राहकांना सोसावा लागत आहे.तीन दिवसांपासून कनेक्टिव्हिटी नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केलेली आहे. मात्र बीएसएनएल व आउटसोर्सिंग कंपनीतील अधिकार्‍यांना अद्याप यात यश आलेले नाही. पर्यायी व्यवस्थेसाठी रिलायन्सच्या टावरची यंत्रणा उभारली आहे. तांत्रिक अडचणी दूर होताच व्यवहार नियमित सुरळीत होतील.-एस. टी. बोर्डे मुख्य व्यवस्थापक, स्टेट बँक, अकोला