शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रा.स्व. संघाचा राजकारणावर प्रभाव

By admin | Updated: September 28, 2014 23:45 IST

अकोला येथील संघाच्या विजयादशमी उत्सवात शरदराव ढोले यांचे प्रतिपादन

अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय किंवा धार्मिक संघटना नसून, हिंदूचं एक बलाढय़ संघटन आहे. संघ कधीही राजकारण करीत नाही; मात्र संघाचा राजकारणावर प्रभाव निश्‍चितच आहे, असे प्रतिपादन पश्‍चिम क्षेत्रीय धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले यांनी येथे केले. रा.स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून अकोला जनता बँकेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक भीमराव धोत्रे होते. व्यासपीठावर संघाचे विभाग संघचालक वासुदेवराव नळकांडे, नगर संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. स्वयंसेवकांनी विविध प्रकारचे योग, घोष, सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके सादर केली. १९४८ मध्ये देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनी मी संघ नष्ट करेन, असे म्हटले होते; परंतु आज देशाचा पंतप्रधान म्हणून संघाचा एक स्वयंसेवक विराजमान झाला आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी संघ राजकारण करणार नाही, मात्र संघाचा राजकारणावर प्रभाव असेल, असे सांगितले होते. देशाच्या राजकारणावर संघाचा प्रभाव आहे. भाजपच नाही तर इतर कोणताही पक्ष आला तरी आम्ही त्याला चालवू; परंतु त्यासाठी त्या पक्षाने हिंदूशी संबंधित, देशहिताशी संबंधित निर्णय घेतले पाहिजेत, असे शरद ढोले यांनी यावेळी स्पष्ट केले. **मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वयंसेवक झटतातनिवडणुकांदरम्यान संघाचे स्वयंसेवक बाहेर पडून काम करतात. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. यासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करतात. संघाच्या प्रयत्नांमुळेच मतदानाची टक्केवारी वाढली आहे. नागरिक मतदानासाठी बाहेर पडू लागले आहेत, असेही शरदराव ढोले यांनी सांगितले.