शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कोअर बँकींगसाठी २५ कोटींची उधळपट्टी

By admin | Updated: May 12, 2015 00:00 IST

एसटी को-ऑप. बँकेत गैरव्यवहार झाल्याचा इंटकचे जयप्रकाश छाजेड यांचा आरोप.

बुलडाणा : स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेने मध्यंतरीच्या काळात राज्यातील सर्व बँकेच्या शाखा कोअर बँकींगने जोडल्या, यासाठी २५ कोटी रुपये खर्च केले. वास्तविक जे काम एक - दीड कोटीचे होते त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या संचालक मंडळाने केल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (ंइंटक) चे अध्यक्ष माजी आ. जय प्रकाश छाजेड यांनी केला.२७ मे रोजी स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली असून या निवडणूकीच्या प्रचारार्थ जयप्रकाश छाजेड बुलडाणा येथे आले असता ते लोकमतशी बोलत होते. मागील १५ वर्षापासून ही बँक मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या ताब्यात आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात बँकेची कोणतीच प्रगती झाली नसून उलट हि बँक संचालक मंडळासाठी भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. २५ कोटी रूपये खर्च करून कोअर बँकींग झाली खरी मात्र, सुरूवातीपासूनच कोअर बँकींग प्रणाली बंद आहे. राज्यात एकही एटीएम मशिन लावण्यात आले नाही. जे काम एक ते दिड कोटी रूपयात होऊ शकते त्यावर २५ कोटी रू पयाचा खर्च दाखवून गैरव्यवहार केला. असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण आणि संघटनेचे सचिव हनुमंतराव ताटे यांनी गैरमार्गाने स्वत:च्या नातेवाईकांना बँकेत नोकर्‍या दिल्या तर, बॅँक सभासदांचे अपघात विम्याचे बेकायदेशीररित्या ३९0 रूपयाची कपात करून सभासदांकडून जास्तीची रक्कम उकळले. याशिवाय बँकेच्या १५६ कोटी रुपयाच्या ठेवी अत्यंत कमी व्यजदरात परराज्याच्या बँकामध्ये ठेवल्या आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आम्ही केल्याचे जयप्रकाश छाजेड यांनी सांगीतले. यासंदर्भात एसटी को-ऑप. बँकेचे संचालक हनुमंतराव ताटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आणि अज्ञानपणाचा असल्याचे म्हटले. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनानुसारच कोअर बँकींगची कामे सुरू आहेत. यामध्ये कोठलाही आर्थिक गैरव्यवहार झाला नाही. एसटी को-ऑप. बँकेच्या निवडणुका असल्यामुळे मतांचे विभाजन करण्यासाठी विरोधकाकडून अपप्रचार व चिखलफेक सुरू असल्याचे ते म्हणाले.