शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

दरवळतोय उटण्यांचा सुगंध..

By admin | Updated: October 23, 2014 02:08 IST

वनौषधींच्या मिश्रणामुळे आरोग्यास उपयुक्त.

अकोला : मांगल्याचे प्रतीक असणार्‍या दीपोत्सवाची चाहूल लागताच बाजारपेठेत विशेष महत्त्व असणार्‍या सुगंधी उटण्यांची मागणी वाढली आहे. दीपावलीतील अभ्यंग स्नानात उटण्याला विशेष महत्त्व असून, उटणे हे वनौषधींपासून बनविलेले असावे, असा संकेत आहे. दिवाळीचा सण म्हणजे थंडीला सुरुवात होते. मात्र, यंदा थंडी गायब झाली असून, बर्‍यापैकी उकाडा जाणवत असतानाही नागरिकांकडून उटण्याला चांगलीच मागणी होत आहे. हिवाळय़ात त्वचेची काळजी घेण्यासाठी उटणे उपयुक्त ठरते. उटणे चंदन, गुलाब, मोगरा, कापूर कचरी, नागरमोथा, वाळा, आंबेहळद, बावची, कचुरा वडा, दवणा, मारवा यापासून तयार केले जाते. पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान केले जाते. अभ्यंग म्हणजे पायापासून डोक्याच्या दिशेने तेल लावणे होय. हे स्नान दिवाळी ते संक्रांत असे चार महिने करावे, असे आयुर्वेद सांगते. अभ्यंग स्नान हे तिळाच्या तेलापासून केले जाते. तिळाचे तेल ज्या वनौषधीबरोबर प्रक्रिया करावे तिचे गुण आत्मसात करते. तिळाचे तेल हे उष्ण, तीक्ष्ण व सूक्ष्म गुणाचे असते, ते शरीराचा ताण कमी करते. साबणातील फेसामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल व आद्र्रताही निघून जाते तर उटण्यामुळे ती राखली जाते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास दिवाळी पर्वात ब्रह्मंडात तेज, आप आणि वायुयुक्त चैतन्य प्रवाहांचे भूतलावर येण्याचे प्रमाण जास्त असल्याने वायुमंडलात देवत्वाचे प्रमाणही जास्त असते. या देवत्वरूपी चैतन्यकणांचे त्या त्या घटकांतून ग्रहण होऊन त्याचा त्याला चैतन्य फलप्राप्तीच्या दृष्टीने अधिक लाभ व्हावा, यासाठी या काळात तेज, आप आणि वायुवर्धक उटणे अंगाला लावून देहाची चैतन्य ग्रहण करण्यातील संवेदनशीलता वाढवली जाते.