शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
2
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
3
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
4
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
5
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
6
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
7
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
8
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
9
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
10
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
11
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
12
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
13
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
14
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
15
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
16
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
17
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
18
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
19
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
20
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांसह युवा पिढीला व्हिजन सिंड्रोमचा धोका

By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST

कॉम्प्युटरमुळे व्हिजन सिंड्रोमचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

अकोला : आज प्रत्येकाच्या घरात संगणकाने जागा मिळविली आहे. उन्हाळय़ाच्या सुट्या लागलेल्या असल्याने लहान मुले व युवा पिढी संगणकाच्या विश्‍वात रमलेली दिसून येते; मात्र तासन्तास संगणकासमोर बसून राहण्याने त्याचा विपरीत परिणाम लहान मुले व युवा वर्गाच्या आरोग्यावर होत असून, कॉम्प्युटरमुळे व्हिजन सिंड्रोमचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे घराघरात संगणक पोहोचला आहे. संगणक घरात असल्यामुळे बच्चे कंपनी त्यांच्या विश्‍वात रमू लागली आहे. युवा वर्ग व घरातील मोठी मंडळीदेखील यात रममाण होत असल्याचे चित्र आहे. परिणामी शरीरास आवश्यक असलेल्या मैदानी खेळाकडे प्रत्येक जण पाठ फरवित असल्याचे दिसून येते. तासन्तास संगणकासमोर बसून गेम्स खेळणार्‍या बच्चे कंपनीला काटरुनच आता जवळचे साथीदार वाटू लागले आहेत. तर युवा पिढीदेखील फेसबुकसारख्या सोशल मीडिया साईट्समध्ये डोके खुपसून बसलेली असतात. आजची टेक्नोसॅव्ही युवा पिढी त्याला सहज हाताळत आहे. मग काय, आपल्या आवडीचे गेम्स वा साईट्स सर्च करताना दोन-तीन तास कसे उलटून जातात, हेही त्यांना कळत नाही. संगणकाचा कामासाठी कमी आणि मनोरंजनासाठी अधिक वापर होत असल्याचे दिसून येते. अगदी तहान-भूक विसरून रममाण होताना नित्याची दिनर्चादेखील बाजूला सारली जाते. अधिक काळ स्क्रिनसमोर बसून राहण्याने कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोमचा धोका वाढला असल्याचे संकेत तज्ज्ञांनी दिला आहे. ५ वर्षांंपासून ते १५ वर्षे वयाच्या मुलांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असून, हे प्रमाण दिवसागणिक २0 टक्क्याने वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकसारखे कॉम्प्युटरसमोर बसल्यामुळे डोळय़ांवर ताण पडून दृष्टी क्षमता कमी होऊ शकते, या पृष्ठभूमीवर पालकांना सावधानतेचा इशरादेखील देण्यात आला आहे.

** लक्षणे

संगणकावर एकटक बघितल्याने डोळय़ांवर ताण येतो. डोळे कोरडे पडतात. पापण्यांच्या हालचाली होत नाहीत. डोळय़ातून पाणी येते. डोळे लाल होणे, डोळय़ांना खाज सुटणे अशा प्रकारचे त्रास सुरू होतात. परिणामी नेत्ररोग होण्याची अधिक संभावना बळावते. डोकेदुखीचादेखील त्रास होतो. केवळ मुलांनाच नव्हे, तर युवा पिढीला व मोठय़ा मंडळींनादेखील हा त्रास होतो.