शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगामही धोक्यात

By admin | Updated: October 25, 2014 01:18 IST

ओलावा नसल्याने अकोला जिल्ह्यात पेरण्या रखडल्यात.

संतोष येलकर / अकोलाअल्प पावसामुळे खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीन ही पिके हातची गेली असतानाही रब्बी हंगामातील पेरण्यांची तयारी शेतकर्‍यांनी केली खरी; मात्र जमिनीत ओलावा कमी असल्याने, जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे खरीप पिकांसोबतच आता रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.यावर्षी पावसाळ्यात तब्बल सव्वा महिना उशिराने पावसाने हजेरी लावली, पाऊस लांबल्याने खरीप हंगामातील पेरण्या उशिराने सुरू करण्यात आल्या होत्या. आधीच उशिरा आलेला पाऊस आणि त्यानंतर कमी झालेल्या पावसामुळे खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक आले नाही. तसेच सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही प्रचंड घट झाली. एकरी ५0 किलो ते एक क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले. पिकांचे उत्पादन बुडाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांची दिवाळी टंचाईतच जात आहे. ज्या भागात जमिनीत तीन ते चार इंचापर्यंत ओलावा आहे, अशा भागात रब्बी पेरण्या सुरू करण्यात आल्या; परंतु जिल्ह्यातील बहुतांश भागात जमिनीतील ओलावा खोल गेल्याने, दिवाळी उलटून जात असली तरी, रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ३२ हजार २00 हेक्टर क्षेत्रावर हरभरा, गहू, करडई व सूर्यफूल इत्यादी रब्बी पिकांच्या मुख्याने हरभरा पेरणीचा समावेश आहे. पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे; मात्र नियोजनाच्या तुलनेत आतापर्यंत केवळ पाच ते सात टक्के पेरण्या झाल्या असून, त्यामध्ये प्राजिल्ह्यात ज्या भागात जमिनीत ओलावा आहे, त्या भागात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या; मात्र जमिनीतील ओल खोल गेलेल्या भागात पेरण्या सुरू होणे बाकी आहे. जमिनीत ओलावा कमी असल्याने जिल्ह्यात सार्वत्रिक रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या नाही. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा केली जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी सांगीतले.