महसूल कर्मचार्‍यांच्या उद्या बदल्या

By Admin | Updated: May 29, 2014 00:01 IST2014-05-28T23:29:49+5:302014-05-29T00:01:02+5:30

महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा पोळा शुक्रवार, ३० मे रोजी फुटणार आहे.

Revenue employees change tomorrow | महसूल कर्मचार्‍यांच्या उद्या बदल्या

महसूल कर्मचार्‍यांच्या उद्या बदल्या

अकोला : महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा पोळा शुक्रवार, ३० मे रोजी फुटणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांतर्गत बदलीस पात्र कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढण्यात येणार आहेत. त्यामध्ये लिपिक, अव्वल कारकून, तलाठी, मंडळ अधिकारी व शिपाई इत्यादी संवर्गातील कर्मचार्‍यांच्या समावेश राहणार आहे.

Web Title: Revenue employees change tomorrow