शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जाचे पुनर्गठण अडकले बँकांमध्ये

By admin | Updated: May 9, 2015 01:59 IST

अकोला जिल्ह्यातील कर्जदार शेतक-यांना पीककर्ज केव्हा मिळणार?

संतोष येलकर/ अकोला : दुष्काळी परिस्थितीत कर्जदार शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण आणि त्यांना पुन्हा पीककर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात असला तरी ८ मेपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १0 हजारांवर कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले नाही. कर्जाचे पुनर्गठन करण्याची प्रक्रियाच बँकांमध्ये अडकल्याने, कर्जदार शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत.यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थि तीत शेतकरी हवालदिल झाला. दुष्काळाच्या दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याच्या पृष्ठभूमीवर २0१४-१५ मध्ये पीककर्ज घेतलेल्या कर्जदार शेतकर्‍यांच्या पीककर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करून शेतकर्‍यांना यावर्षी नवीन कर्ज उपलब्ध करण्याचा निर्णय ७ एप्रिल रोजी राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करून, त्यांना यावर्षी पुन्हा कर्ज उपलब्ध करण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांमार्फत १३ व २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह जिल्ह्यातील २७ राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आले. सन २0१४-१५ मध्ये जिल्ह्यात १ लाख १७ हजार ५५९ शेतकर्‍यांनी पीककर्ज घेतले आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या ७0 हजार शेतकर्‍यांसह राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या ४८ हजार कर्जदार शेतकर्‍यांचा समावेश आहे. कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठण करण्याची प्रक्रिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अद्याप सुरू करण्यात आली नसल्याने, ७0 शेतकर्‍यांच्या कर्जाचे पुनर्गठण होणे अद्याप बाकी आहे.