शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
हरभजन सिंगविरोधात समर्थकांचा रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
4
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
5
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
6
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
7
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
8
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
9
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
10
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
11
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
18
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
19
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
20
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
Daily Top 2Weekly Top 5

मतदान साहित्य वितरणाची तयारी पूर्ण; मतदान पथके रविवारी होणार रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 13:22 IST

मतदान पथकांना मतदानाचे साहित्य वितरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांत मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी रविवार, २० आॅक्टोबर रोजी मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना होणार असून, मतदान पथकांना मतदानाचे साहित्य वितरणाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी २० आॅक्टोबर रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची मतदान पथके मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत. त्यानुषंगाने मतदान पथकांना मतदान साहित्य वितरणाची तयारी पाचही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी मतदान पथकांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम), व्हीव्हीपॅट सोबतच मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी, मतांची हिशोब पत्रिका, अभिरूप मतदान प्रमाणपत्र, मतदान प्रक्रिया सुरू झाल्याची व बंद झाल्याची नोंदवही, प्रदत्त मतपत्रिका, मतदान केंद्र भेटपुस्तिका, चिन्हांकित मतदार यादी यासह इतर अनुषंगिक साहित्य मतदान पथकांसोबत पाठविण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.अकोला पूर्व मतदारसंघात ‘सखी’ व ‘दिव्यांग’ मतदान केंद्र!अकोला पूर्व मतदारसंघात शहरातील सीताबाई कला महाविद्यालयात मतदान केंद्र क्रमांक २१४ येथे महिला मतदारांसाठी ‘सखी’ मतदान केंद्र आणि मतदान केंद्र क्रमांक २१७ येथे दिव्यांग मतदारांसाठी ‘दिव्यांग’ मतदान केंद्र राहणार आहे, असे अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019