शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
2
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
3
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
4
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
5
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
6
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
7
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
8
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
9
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
10
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
11
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
12
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
13
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
14
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
15
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
16
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
17
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
18
संचारसाथी ॲप : पाणी मुरते आहे, ते नेमके कुठे?
19
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
20
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम वऱ्हाडात पावसाचा जोर वाढला; नदी-नाल्यांना पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:28 IST

पश्चिम वऱ्हाडात गुरुवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. परिणामी, अकोला, बुलढाणा आणि वाशिम, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक नदी- नाल्यांना पूर आला असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

अकोला : पश्चिम वऱ्हाडात गुरुवारी पावसाचा जोर चांगलाच वाढला. परिणामी, अकोला, बुलढाणा आणि वाशिम, या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक नदी- नाल्यांना पूर आला असून, काही मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. सायंकाळनंतर येथून वाहतूक सुरू झाली. काही गावांचा संपर्क तुटला. बुलढाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यात पुरात अडकलेल्या पाच नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळणार असून, उगवलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे.

अकोला जिल्ह्यात अनेक गावांत पाणी शिरलेअकोला जिल्ह्यात बार्शिटाकळी तालुक्यातील विश्वमित्र लघुप्रकल्प १०० टक्के भरून ओसंडू लागला आहे. मळसूर येथे नदीचे पाणी गावात शिरले आहे, तर सारकिन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. बार्शिटाकळी व पातूर तालुक्यांतील खोबरा नाल्याला पूर आल्याने काही गावांत पाणी शिरले आहे. पातूर तालुक्यात झरांडी, मरसूळ व आलेगाव या गावांमध्येही पाणी शिरले आहे. अकोला शहरातदेखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वाशिम जिल्ह्यातही जोरदार हजेरीवाशिम जिल्ह्यात रिसोड, मालेगाव आणि मंगरूळपीर तालुक्यांतील काही भागांत नदी-नाल्यांना पूर आला आहे. गुरुवारी सकाळी ०९:०० वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात ८८.५० मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे अनेक लहान-मोठ्या नद्या, नाल्यांना पूर आला असून, लगतच्या शेतीत पाणी शिरल्याने नुकतीच उगवलेली पिके पाण्यात गेली आहेत. रिसोड तालुक्यात काच नदी व उतावळी नदीला पूर आल्याने मेहकर- मालेगाव हा मार्ग दुपारपर्यंत बंद होता.

२३ महसूल मंडळांत अतिवृष्टी; पुरात अडकलेल्यांची सुटकाबुलढाणा जिल्ह्यात मेहकर व लोणार तालुक्यांमध्ये २५ जूनपासून ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील ९२ पैकी २३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. डोणगाव येथील पाच शेतकरी पुरात अडकले होते. शेलगाव देशमुख रस्त्यावरील कास नदीपात्रात डोणगावचे गोविंद परमाळे, आकाश परमाळे, कुलदीप परमाळे, अनिल परमाळे आणि ज्ञानेश्वर कन्हाळे हे शेतकरी सकाळी शेतीकामासाठी नदीपात्राच्या पलीकडे गेले होते. अचानक आलेल्या पुरामुळे परतीचा मार्ग बंद झाला. त्यांनी निंबाच्या झाडावर आश्रय घेतला. स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मेहकर- रिसोड, सुलतानपूर- मेहकर आणि मेहकर- डोणगाव हे मार्ग पुरामुळे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र