शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधताना रेल्वे पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : अकाेला रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे तसेच दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : अकाेला रेल्वे स्टेशन हे मध्य रेल्वे तसेच दक्षिण मध्य रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. वाशिम व अकोला या दोन जिल्ह्यांत झालेल्या रेल्वे अपघातांतील मृत्यू झाल्याची नाेंदसुद्धा अकाेला येथेच करण्यात येत असून सन २०१९ ते २०२० मध्ये एकूण १५ अपघाती मृत्यूची नाेंद आहे. यामधील ७ मृतांच्या नातेवाइकांच्या शाेधासाठी पाेलिसांना चांगलीच दमछाक करावी लागली. अखेर ज्या मृतदेहांची ओळख पटली नाही, त्यांच्यावर रेल्वे पाेलिसांनी अंत्यसंस्कार केले. २०१९ मध्ये अपघाती १२ मृत्यू झालेल्यांपैकी सात जणांची ओळख पटली, तर २०२० मध्ये तीन अपघाती मृत्यू झालेल्यांपैकी केवळ एकाचीच ओळख पटली हाेती. त्यामुळे अनाेळखी सात मृतदेहांवर रेल्वे पाेलिसांनी अंत्यसंस्कार केले.

................

सात मृतदेहांची ओळख पटली नाही.

सन २०१९ मधील ५ व २०२० मधील २ अशा एकूण ७ मृतदेहांची ओळख रेल्वे पाेलिसांना पटली नाही.

सन २०१९ मधील ७ व २०२० मधील १ अशा एकूण ८ बेवारस मृतदेहांची ओळख पटविण्यास रेल्वे पाेलिसांना यश आले.

२०१९-२० मध्ये एकूण १९ अपघात घडले. यामध्ये ४ किरकाेळ स्वरूपाचे, तर १५ जणांच्या मृत्यूचा समावेश आहे.

..................

अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यांत झालेले रेल्वे अपघात, अपघाती मृत्यूची नाेंद अकाेला येथे करण्यात येते. अकाेला व वाशिम रेल्वे स्थानकावर एकूण १५ अपघाती मृत्यू झाले. यामध्ये अनाेळखी मृतदेहांवर रेल्वेतर्फे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांच्या खिशात किंवा जवळ ओळखपत्र असल्यास लवकर शाेध लागताे.

- किरण साळवे, रेल्वे पोलीस निरीक्षक