शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जुगार क्लबवर छापा; १० अटकेत

By admin | Updated: June 15, 2017 01:22 IST

जमावाने केला पोलिसांवर दबावाचा प्रयत्न, विशेष पथकाने हाताळली परिस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट येथील अंसारच्या वरली अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी बुधवारी छापा टाकून दहा जणांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १७ हजार ५०० रुपये रोखसह ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.खैर मोहम्मद प्लॉटमध्ये अंसार याचा गेल्या अनेक दिवसांपासून वरली अड्डा सुरू आहे. खुलेआम सुरू असलेल्या या वरली अड्ड्याला डाबकी रोड पोलिसांचे अभय असल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे डाबकी रोड पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा चेहरा उघड झाला आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी केलेल्या कारवाईनंतर अन्सारच्या जुगार अड्ड्यावरून भागवतवाडी येथील रहिवासी शेख गफ्फार शेख सत्तार (५५), नायगाव येथील अब्दुल जाफर अब्दुल जब्बार (२९), मोहम्मद सलमान मोहम्मद दस्तबीर (२१), भागवतवाडी येथील भामीरोहीन फमोद्दीन (६५), वानखडे नगरातील अरुण यादवराव देशमुख (५६), नेहरु नगरातील रहिवासी सय्यद मुझफ्फर सय्यद इब्राहीम (४३), जुना चहाचा कारखाना परिसरातील रहिवासी प्रकाश ओंकार धुमोने (४१), अकोट फैलातील रहिवासी राजू बबन घोडके (३५), वाशिम बायपास परिसरातील रहिवासी नितीन काशीराम पळसपगार (४५) या दहा जुगारींना अटक केली. पथकाने घटनास्थळावरून जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य, मोबाईल व १७ हजार ५०० रुपये रोख असा एकूण ३९हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या कारवाईनंतर जुगारींना अटक करून पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना पथकाला परिसरातील नागरिकांनी अडविण्याचा प्रयत्न केला, यासोबतच विशेष पथकावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला; मात्र विशेष पथकाने या जमावाला न जुमानता सदर १० आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणले.