शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

६0 साहाय्यक नगर रचनाकारांना पदोन्नती

By admin | Updated: July 17, 2015 01:50 IST

६६ पैकी ६0 साहाय्यक नगर रचनाकारांची नगर रचनाकार म्हणून पदोन्नती; सहा जण ‘वेटिंग’वर.

अकोला: महापालिकेच्या नगररचना विभागात सक्षम अधिकार्‍यांअभावी नकाशा मंजुरीसाठी फाईलींचा ढीग साचत असल्याचे चित्र जवळपास सर्वत्रच आहे. यावर उपाय म्हणून नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी ६६ पैकी ६0 साहाय्यक नगर रचनाकारांची नगर रचनाकार म्हणून पदोन्नती केली असून, उर्वरित सहा जण ह्यवेटिंगह्णवर असल्याची माहिती आहे. राज्यात अनधिकृत बांधकामांची वाढती संख्या व चटई क्षेत्र निर्देशांकमध्ये (एफएसआय) वाढ करण्याची बांधकाम व्यावसायिकांची मागणी लक्षात घेता शासनाने या मुद्यावर अभ्यास करून सूचनांचा अहवाल सादर करण्यासाठी मुंबई मनपाचे तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. शासकीय व आरक्षित जमिनी वगळता इतर ठिकाणी उभारलेली अनधिकृत बांधकामे नियमित करणे शक्य असल्याचा अहवाल कुंटे समितीने सादर केला. यादरम्यान, नकाशा मंजुरीच्या फाइल्सचा निपटारा करण्यासाठी संबंधित महापालिकेच्या नगररचना विभागात सक्षम अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याचे शासनाच्या लक्षात आले. त्यानुषंगाने नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी पुणे येथील नगर विकास विभागाचे तत्कालीन संचालक आकोडे यांच्यासोबत रिक्त पदे व डीसी रूलच्या मुद्यावर अनेकदा चर्चा केली. संबंधित विभागाने राज्यातील ६६ साहाय्यक नगर रचनाकारांना नगर रचनाकार म्हणून पदोन्नती देण्याची फाइल परस्पर तयार केल्याचा प्रकार नगर विकास विभागाच्या लक्षात आला होता. या गंभीर प्रकाराची नगर विकास राज्यमंत्र्यांनी दखल घेतली; मात्र मनपामध्ये नगर रचनाकार पद रिक्त असल्याने नकाशा मंजुरीचे कामकाज खोळंबले असल्याने नगर विकास राज्यमंत्र्यांनी ६६ पैकी ६0 साहाय्यक नगर रचनाकार यांना नगर रचनाकार म्हणून गत आठवड्यात पदोन्नती दिली.