शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची संपादणूक चाचण्यांमध्ये प्रगती समाधानकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:48 IST

दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे टक्केवारीवरून दिसून आले आहे.

- नितीन गव्हाळे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात संपादणूक चाचणी घेण्यात आली होती. या संपादणूक चाचणीमध्ये दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे टक्केवारीवरून दिसून आले आहे.जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी शिक्षकांच्या शिकविण्यातील आणि विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकासाचा पाया कच्चा राहू नये, एकही मुलगा अप्रगत राहू नये, यासाठी संपादणूक चाचण्या आयोजित करण्याची संकल्पना मांडली होती. या संपादणूक चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थी ज्या इयत्तेत शिकत आहे, त्या इयत्तेत क्षमतांचीही संपादणूक वेळच्यावेळी तपासून व मदत करून अप्रगत विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यांच्या संकल्पनेनुसार जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील मराठी व उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ५ ते ९ आॅगस्ट आणि २३ ते २७ सप्टेंबर या कालावधीत भाषा, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र विषयावर संपादणूक चाचणी घेण्यात आली होती. या चाचण्यांचे निकाल जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेकडे आले असून, यात इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात येणार आहे.जि.प. सीईओ आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेनुसार संपादणूक पातळी चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांमध्ये इ. दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक असल्याचे दिसून आले. त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यात येणार आहेत.-डॉ. समाधान डुकरे,प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षण