शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

२८ गैरहजर शिक्षकांवर विनावेतनाची कारवाई

By admin | Updated: April 12, 2017 01:47 IST

अकोला- शाळेत वेळेवर उपस्थित नसलेल्या २८ शिक्षकांचा तो दिवस विनावेतन करण्याची कारवाई अकोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केली.

सभापतींच्या भेटीत शाळांचे उघड झाले वास्तव

अकोला: शाळांमध्ये शिक्षक मनमानी पद्धतीने उपस्थित राहतात. शालेय पोषण आहारात प्रचंड गोंधळाच्या बाबी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांच्या प्रत्यक्ष भेटीत उघड झाल्या. त्यामुळे शाळेत वेळेवर उपस्थित नसलेल्या २८ शिक्षकांचा तो दिवस विनावेतन करण्याची कारवाई अकोला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी केली. शिक्षकांना शाळेची नियमित वेळ पाळण्याची अ‍ॅलर्जी असल्याची बाब शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांनी दिलेल्या शाळा भेटीत सोमवारी पुढे आली. बोरगावमंजू येथील मराठी शाळा क्रमांक १,२,३ या शाळांमध्ये सकाळीच सभापती अरबट यांनी भेट दिली. यावेळी उर्दू शाळा क्रमांक १ मध्ये सकाळी ७ वाजता एकही शिक्षक उपस्थित नव्हता. ७.३० वाजेपर्यंत एकूण सात शिक्षक उपस्थित झाले. उर्वरित सहा शिक्षकांचा रजेचा अर्जही नव्हता. जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक तीनमध्ये सर्व शिक्षिका शाळेत उपस्थित नव्हत्या. त्या सर्व शिक्षकांवर कारवाई करण्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्याला देण्यात आले. तर एक आणि दोनमध्येही तीच परिस्थिती होती. त्यामुळे वेळेत गैरहजर असलेल्या सर्व शिक्षकांवर कारवाई करण्याचे पत्र सभापती अरबट यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पवार यांनी २८ शिक्षक-शिक्षिकांवर त्या दिवसाचा पगार न देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षक संघटनांमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्याध्यापकांचा खुलासाही दिला नाहीविशेष म्हणजे, भेटीदरम्यान सभापतींच्या भेटीदरम्यानच गटशिक्षणाधिकारी पवार यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर दुसऱ्या दिवशीही कोणाकडूनच खुलासा सादर झाला नव्हता. त्यामुळे त्यांना पदाधिकारी-अधिकाऱ्यांचाही कुठलाच धाक नसल्याचे स्पष्ट होते. बोरगावातील शाळेत आढळलेल्या अनियमितता, त्रुटी इतरत्र कुठेही आढळणार नाहीत, याची खबरदारी घेण्याचे आदेशही पवार यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे.