प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

By Admin | Updated: June 26, 2014 02:05 IST2014-06-26T01:57:08+5:302014-06-26T02:05:57+5:30

प्राथमिक शिक्षकांचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

Primary teachers protest movement | प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन

अकोला : अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना त्वरित अनुदान देण्यात यावे यासह इतर मागण्यांना घेऊन बुधवारी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. या आंदोलनात शिक्षक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
संघाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात २00९ नंतर अनुदानास पात्र ठरलेल्या व जानेवारी २0१४ पासून अनुदान वितरित झालेल्या शाळांना अनुदानास पात्र ठरविल्यापासून अनुदान वितरित करण्यात यावे, मुख्याध्यापकांना दरमहा ५ हजार रुपये शालेय खर्चाकरिता देण्यात यावे, ३0 विद्यार्थी संख्येमागे एक शिक्षक हा निकष रद्द करून वर्ग तुकडीनिहाय एक शिक्षक द्यावा, कायम विनाअनुदानित (इंग्रजी माध्यम) शाळेतील शिक्षकांना डीटीएड झालेल्यांना ६ हजार तर बी.एड. झालेल्यांना ९ हजार रुपये याप्रमाणे वेतन देण्यात यावे, अतिरिक्त शिक्षकांचे त्वरित समायोजन करावे, रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Web Title: Primary teachers protest movement