शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 18:08 IST

अकोला : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात मतदान व मतमोजणी होणार आहे. सिलबंद मतदान यंत्रे व ...

अकोला: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीकरीता जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघात मतदान व मतमोजणी होणार आहे. सिलबंद मतदान यंत्रे व संबंधित साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील पाचही मतदान मोजणी केंद्रांवर १०० मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बुधवारी आदेश् निर्गमित केले.या सर्व मतमोजणी केंद्रांच्या १०० मिटर परिसरात रविवार दि.२० ते शुक्रवार दि.२५ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.

  • मतदार संघ निहाय मतमोजणीची ठिकाणे
  • अकोट - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, हिवरखेड रोड, अकोट पो.स्टे. अकोट शहर.
  • बाळापुर - शासकीय धान्य गोदाम, ऊर्दू डी.एड. कॉलेजच्या बाजूला, बाळापूर पो. स्टे. बाळापूर.
  • अकोला पश्चिम- शासकीय गोदाम,मंगरुळ पीर रोड, अकोला पोस्टे खदान
  • अकोला पुर्व- शासकीय गोदाम,मंगरुळ पीर रोड, अकोला पोस्टे खदान
  • मुर्तिजापूर- शासकीय गोदाम, उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ, मुर्तिजापुर पो. स्टे. मुर्तिजापूर शहर.

असे आहेत प्रतिबंध१) मतमोजणीच्या वेळी मतमोजणीच्या केंद्रामध्ये अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही.२) ज्यांना प्राधिकृत पास देण्यात आला आहे त्यांना मोबाईल फोन सोबत ठेवता येणार नाही.३) शासकीय वाहना व्यतिरिक्त अन्य वाहनांना प्रवेश देता येणार नाही.४) मतमोजणी केंद्रापासून १०० मिटर पलिकडे वाहनांचे पार्किंग करावे लागेल.५) मतमोजणी कक्षात चित्रीकरणाची परवानगी देता येणार नाही.६) ज्वालाग्राही पदार्थ, वस्तू बाळगता येणार नाही.७) मतमोजणी संपेपर्यंत १०० मिटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशिन, लॅपटॉप, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी मतमोजणी संपे पर्यंत बंद ठेवण्यात येतील.८) मतमोजणी सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी बाधा निर्माण करणारे कोणतेही कृत्य करता येणार नाही.९) अनधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई.१०) हे प्रतिबंधात्म आदेश नियुक्त कर्मचारी, देखरेख करणारे अधिकारी- कर्मचारी यांना कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीने लागू राहणार नाहीत.

 

टॅग्स :AkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019