शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वीज कामगार ते आमदार!

By admin | Updated: October 26, 2014 00:42 IST

संघर्षयात्री आमदार बळीराम भगवान सिरस्कार.

सुरेश नागापुरे / पारस, अनंत वानखडे / बाळापूर

         वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले..कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी तो पारससारख्या खेड्यातून चंद्रपूरसारख्या शहरात जातो.. औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कंत्राटी वीज कामगार म्हणून काम करतो.. बहुजन समाजाप्रती बांधीलकीच्या भावनेतून तो समाजकारणात उडी घेतो.. प्रसंगी राजकाणारतही येतो.. पुढे भारिप-बमसंकडून विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातून निवडणूक लढवितो.. दिग्गजांचा पराभव करून हा युवक आमदार होतो.. या संघर्षयात्री युवकाचे नाव आहे बळीराम भगवान सिरस्कार. बळीराम सिरस्कार यांच्या वडिलांचे ते पाच वर्षांचे असतानाच निधन झाले. त्यामुळे त्यांची आई गंगूबाई यांच्यावर मुलगा बळीराम, वसंतराव, रामराव, विष्णू आणि मुलगी यशोदा यांच्या पालनपोषणाची जबाबदारी येऊन पडली. सर्व भावंडांनीही आईसोबत कष्ट केले. एकीकडे बळीराम हे पारस येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण घेत असताना दुसरीकडे ते शेतातही राबले. मात्र तरीही निर्वाह होत नव्हता. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. ते दहावीपर्यंतच शिकू शकले. १९८0 च्या दशकात त्यांनी चंद्रपूर गाठले. ते चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाले. काही वर्षांनी ते पारस येथे परतले. आर्थिक परिस्थितीमुळे आपण शिकू शकलो नाही, याची खंत त्यांना होती. त्यामुळे बहुजन समाजाच्या सर्वांगीण उद्धारासाठी काही तरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात सातत्याने येत होता. यासाठी राजकारणात उडी घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १९८९ मध्ये राजकारणात उडी घेत ग्रामपंचायत निवडणूक लढवून ते विजयी झाले. १९९0 साली त्यांनी भारिप-बमसंमध्ये प्रवेश केला.ते भारिपचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. २00२ मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महापूर आला. ते पूरग्रस्तांसाठी अहोरात्र झटले. २00९ मध्ये पक्षाने त्यांना जि.प. निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज न होता ते निष्ठेने पक्षाचे काम करीत राहिले. त्यामुळे नंतर झालेल्या विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यांना २0१४ च्या निवडणुकीत पुन्हा संधी देण्यात आली. ते दुसर्‍यांदा विजयी झाले.