शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आपल्या शिवारात अभियान !

By admin | Updated: July 17, 2017 03:08 IST

पोलीस अधीक्षकांची संकल्पना: पोलीस गावांमध्ये जाऊन नागरिकांसोबत साधणार संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद निर्माण होऊन समन्वय राखल्या जावा, यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून पोलीस आपल्या शिवारात अभियान १७ ते २३ जुलैदरम्यान राबविण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यांमधील अधिकारी व कर्मचारी गावांमध्ये जाऊन नागरिक, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या, सण, उत्सव आणि गावातील परिस्थितीची माहिती जाणून घेतील. नुकतेच संपलेले शेतकरी आंदोलन, पावसाची अनियमितता, येणारा पोळा उत्सव या पृष्ठभूमीवर पोलीस आणि ग्रामीण भागातील नागरिक विशेषत: शेतकरी यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी आणि समन्वय निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस आपल्या शिवारात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानादरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार पोलीस ठाण्याचे ठाणेदार, पोलीस अधिकारी, कर्मचारी, अंमलदार हे हद्दीतील गावांना भेटी देऊन तेथील नागरिक, शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्यांसह सण, उत्सव आणि गावातील जातीय परिस्थिती, गतकाळात घडलेल्या घटना याबाबत माहिती जाणून घेतली. नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पोलिसांची प्रतिमा उंचाविण्यासाठी आणि पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण व्हावी, ही या अभियानामागील भावना असल्याचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्पष्ट केले आहे. या अभियानाचा प्रारंभ खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम चांदुर येथून होणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे उपस्थित राहून नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. यासोबतच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलीस आपल्या शिवारात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, तंटामुक्त ग्राम समिती, शाळा मुख्याध्यापक, कृषी सहायक, राजकीय नेते यांचीसुद्धा मदत घेण्यात येणार आहे. पोलीस मित्र, ग्रामरक्षक सदस्य नोंदणीही करणार!गावांमधील घटना, घडामोडींची पोलिसांना माहिती व्हावी, गावामध्ये शांतता नांदावी, यासाठी पोलीस दलाच्यावतीने पोलीस मित्र व ग्रामरक्षक सदस्य नोंदणीवर भर देण्यात येत आहे. पोलीस आपल्या शिवारात अभियानादरम्यान अनेक गावांमध्ये जाऊन पोलिसांकडून पोलीस मित्र आणि ग्रामरक्षक सदस्य नोंदणीसुद्धा करण्यात येणार आहे.