शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृवित आंतराष्ट्रीय शेतकरी मेळावा!

By admin | Updated: November 11, 2014 23:37 IST

कोरडवाहू, सिंचन, व्यावसायिक शेतीवर होणार मंथन; विदेशी शेतकरी राहणार उपस्थित.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात येत्या डिसेंबर महिन्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला अनेक देशातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. बदलते हवामान, कोरडवाहू शेती, ओलिताची शेती, तसेच व्यावसायीक शेती या विषयांवर या मेळाव्यात मंथन होणार आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशातील पहिले कृषी प्रदर्शन दिल्ली येथे भरविले होते. शेतकर्‍यांना आधुनिक शेती व शेतीसंबधीच्या नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व त्यांनी ते अवगत करावे, हा त्या कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामागचा उद्देश होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ती पंरपरा कायम ठेवली असून, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून, विद्यापीठात कृषी मेळावा, प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, संशोधन आणि शेती विकासासाठीच्या विद्यापीठाच्या शिफारशी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृषी विद्यापीठात प्रथमच आंतरराष्ट्रीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध देशातील प्रगतिशील, तज्ज्ञ शेतकरी या प्रदर्शनीला उपस्थित राहणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. एम. टाले यांनी कळवले.