शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चार हजारांवर शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 12:02 IST

आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ९८ शिक्षकांनी ‘निष्ठा’चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

अकोला: मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत संपूर्ण देशात ‘निष्ठा’ प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ९८ शिक्षकांनी ‘निष्ठा’चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांना शिकविताना या प्रशिक्षणाचा शिक्षकांना लाभ होणार आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून ‘निष्ठा’ची अंमलबजावणी होणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात तालुकानिहाय नियोजनानुसार ६ मार्चपर्यंत शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. यामध्ये शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकविणारे शिक्षक, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, विशेष तज्ज्ञ, विशेष शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, प्रशासन अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, डायटमधील सर्व अधिकारी या सर्वांना निष्ठाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद दिल्ली यांनी तयार केलेल्या निष्ठा पोर्टलवर आॅनलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा शैक्षणिकदृष्ट्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. (प्रतिनिधी)छाया: शिक्षकांचा फोटोजिल्ह्यातील चार हजारांवर शिक्षकांना गत महिनाभरात ‘निष्ठा’चे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे शालेय गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवायचे, याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.- डॉ. समाधान डुकरे, प्राचार्यजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.‘निष्ठा’ प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, विद्यार्थी केंद्रित अध्यापनशास्त्र, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, समावेशित शिक्षण, अध्ययन अध्यापनात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर, शालेय नेतृत्वाची गुणवैशिष्ट्ये,पर्यावरणविषयक जनजागृती, शाळापूर्व शिक्षण व आनंददायी वातावरणात शाळा पातळीवरील मूल्यमापन तसेच गणित-विज्ञान व भाषा अध्यापनशास्त्र अशा विविध विषयांच्या अनुषंगाने कृतियुक्त प्रशिक्षण देण्यात आले आहे.- जितेंद्र काठोळेनिष्ठा प्रशिक्षण प्रशिक्षकजिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्र