महान-अकोला मार्गावरील बिहाड माथानजीकची घटना
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}निहिदा : महान-अकोला रस्त्यावरील बिहाड माथानजीक ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार, दि. ३० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. बार्शिटाकळी तालुक्यातील तिवसा येथील रहिवासी विलास महादेव घरट हे जागीच ठार झाले, तर रवींद्र वासुदेव घरट हे गंभीर जखमी झाले आहेत. जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिकेचे चालक सचिन आगाशे यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले. यावेळी जीवरक्षक दीपक सदाफळे, पोलीस कर्मचारी, तिवसा येथील सरपंच गजानन पाटील लुले, संतोष पाटील पागृत, रतन राठोड उपस्थित होते.