शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आता महापौरांच्या कक्षात ठिय्या

By admin | Updated: May 31, 2017 02:19 IST

शिवसेना गटनेता राजेश मिश्रा यांची पत्रकार परिषदेत घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: करवाढीच्या विरोधात सोमवारी महापालिका आमसभेत आंदोलनात्मक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या दोन नगरसेवकांसह काँग्रेसचे विरोधी पक्षनेता साजिद खान यांच्यावर एक दिवसासाठी निलंबनाची कारवाई केली. सेनेच्या या आंदोलनामुळे निलंबित झालेल्या नगरसेवकांचे सर्वसामान्य अकोलेकरांकडून ठिकठिकाणी हारतुरे देऊन कौतुक होत आहे. अकोलेकरांकडून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन महापौर विजय अग्रवाल यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.विद्यायक मार्गाने आम्ही ठिय्या देऊ; पण आमच्यासोबत हुज्जत घातली गेली तर शिवसेनेच्या स्टाइलने आंदोलनाची भूमिका बदलली जाईल, असा इशारा शिवसेना गटनेता राजेश मिश्रा यांनी दिला. आमदार गोपीकिसन बाजोरिया यांच्या गांधी मार्गावरील कार्यालयात ही पत्रकार परिषद घेतली गेली. याप्रसंगी सेना शहरप्रमुख तरुण बगेरे, नगरसेविका मंजूषा शेळके, गजानन चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.शिवसेनेने ८० टक्के समाजकारणच केले, राजकारण केवळ २० टक्के केले. करवाढीच्या विरोधात सेनेची भूमिका अकोलेकरांसोबत आहे. भाजपाने बडतर्फीची कारवाई केली तरी आम्ही भूमिका बदलणार नाही, असेही येथे मिश्रा म्हणाले. जर बजेटच्या मिटिंगमध्ये चार तास साफसफाईवर चर्चा होते, मग आमसभेत करवाढीसंदर्भात चर्चा का घेतली जात नाही? विशेष सभेची मागणी आम्ही केली तेव्हा महापौरांनी घेणार नाही, अशी भाषा वापरली. शेवटी याबाबत शिवसेनेला आंदोलनात्मक भूमिकेशिवाय पर्याय राहिला नव्हता. आम्ही हे आंदोलन सुरू ठेवू, ज्या पक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना आमच्या सोबत यायचे असेल त्यांचे स्वागत आहे. काही भाजपचे नगरसेवकही आमच्या भूमिकेसोबत असल्याचे मिश्रा यांनी येथे सांगितले. अकोला महापालिकेत सबका साथ, खुदका विकास सुरू आहे. आम्ही मोदीच्या सबका विकासासोबत आहोत, असा आरोप त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केला. पूर्वीच्या चार पट करवाढ आम्हाला मान्य आहे; मात्र अव्वाच्या सव्वा केलेली करवाढ अकोलेकरांवर अन्यायकारक आहे. वेळ पडल्यास याप्रकरणी आम्ही जनहित याचिका दाखल करू. त्या दिशेने आमचे आमदार प्रयत्नशील आहेत. महापालिकेतील इतर पक्षांच्या नगरसेवकांना वाटत असेल तर त्यांनी आमच्या सोबत यावे, असे आवाहनही शिवसेनेने केले. येत्या तीन दिवसात आपले आंदोलन छेडले जाईल, असेही मिश्रा सरतेशेवटी म्हणाले.