शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

खतांच्या बफर स्टॉकचे नियोजनच नाही!

By admin | Updated: May 15, 2015 01:35 IST

अमरावती विभागात ६ लाख मेट्रिक टन खतसाठा मंजूर.

संतोष येलकर / अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात खतांची मागणी आणि त्या तुलनेत जिल्हानिहाय करावयाचा पुरवठा, यासंदर्भात राज्याच्या कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आले असले तरी, तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी खतांच्या संरक्षित साठय़ाचे (बफर स्टॉक) नियोजनच कृषी विभागामार्फत करण्यात आले नाही. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसाठी ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. काळाबाजार रोखण्यासाठी या व्यतिरिक्त संरक्षित खतसाठा निश्‍चित करणे गरजेचे होते. दरवर्षी खरीप हंगामात प्रत्येक जिल्ह्यात लागणार्‍या खतांची मागणी विचारात घेता, खतपुरवठय़ाचे नियोजन राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येते. या नियोजनात जिल्हानिहाय संरक्षित खतसाठादेखील निश्‍चित करण्यात येत होता. खरीप हंगामात मागणीच्या तुलनेत खतांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या कालावधीत जिल्हा स्तरावर करण्यात आलेला खतांचा संरक्षित साठा विक्रीसाठी मुक्त करण्यात येत होता. त्यामुळे तुटवड्याच्या कालावधीतही शेतकर्‍यांना खते उपलब्ध करुन देण्याच्या अडचणीवर मात करता येत होती. त्यासोबतच खत विक्रीच्या काळाबाजारावरही नियंत्रण ठेवल्या जात होते. यावर्षीच्या खरीप हंगामात खतांची मागणी आणि त्या तुलनेत जिल्हानिहाय खतांचे आवंटन राज्याच्या कृषी विभागामार्फत मंजूर करण्यात आले असले तरी, त्यामध्ये संरक्षित खतसाठा निश्‍चित करण्यात आला नाही. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात ६ लाख ७२ हजार २६१ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली असून, त्यापैकी ६ लाख ३६ हजार २00 मेट्रिक टन खतसाठय़ाचे आवंटन कृषी विभागामार्फत मंजूर करण्यात आले आहे. खतसाठय़ाचे आवंटन मंजूर करण्यात आले असले तरी, निर्माण होणार्‍या तुटवड्याच्या कालावधीत शेतकर्‍यांसाठी उपयोगी पडणार्‍या संरक्षित खतसाठय़ाचे जिल्हा नियोजन मात्र करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हानिहाय संरक्षित खतसाठा निश्‍चित करण्यात आला नाही.