शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमच्या कैद्यांना नवीन ‘घर’

By admin | Updated: September 18, 2014 01:26 IST

आदेश धडकले : नवीन कारागृहासाठी एक ऑक्टोबरचा मुहूर्त

धनंजय कपाले /वाशिमकैद्यांची वाढणारी संख्या आणि अपुरी पडणारी कारागृहे यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेता, गृह विभागाने वाशिम जिल्हा कारागृहाची निर्मिती करून बरीच वर्षे लोटली. या नवीन कारागृहाची दारे १ ऑक्टोबर रोजी उघडली जाणार असून, तशा सूचनाही जिल्ह्यातील सर्व न्यायालयांना राज्याचे पोलिस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक (तुरूंग) यांनी पाठविल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील शेकडो आरोपींची ने-आण करताना, गत अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर ताण वाढू लागला. पोलिस यंत्रणेवरील हा ताण कमी करण्यासाठी गृह विभागाने वाशिम येथे नवीन जिल्हा कारागृहाची निर्मिती केली. हे कारागृह ५00 कैद्यांच्या क्षमतेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अकोला येथील तुरूंगात असलेल्या कैद्यांना १ ऑक्टोबरपासून वाशिम तुरूंगात हलविले जाणार आहे. निवडणूक आचारसंहिता असल्याने या कारागृहाची दारे प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीतच उघडणार आहेत. वाशिम पोलिस दलासाठी हे कारागृह सोयीचे ठरणार आहे. वाशिमसाठी हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी, आचारसंहितेमुळे कोणत्याही नेत्याला कारागृहाचे ह्यराजकारणह्ण करता येणार नाही, हे तेवढेच सत्य.**वाशिम पोलिस दलाचा खर्च वाचलावाशिम जिल्ह्यातील कैद्यांची ने-आण करण्यासाठी पोलिस खात्याच्या वाहनांवर डिझेलचा खर्च मोठय़ा प्रमाणात करावा लागत होता. या खर्चासाठी महिन्याकाठी कमीत कमी लाख रूपयांची तरतूद करावी लागत होती. आता मात्र हा खर्च करण्याची गरजच उरली नाही. याशिवाय आरोपींना अकोला येथे ने-आण करण्यासाठी पोलिस कर्मचारी ५ ते ६ तासासाठी अकोला येथे रवाना करावे लागत होते. आता पोलिसांचा हा ताणही कमी झाला आहे. यामुळे पोलिस दलामध्ये या निर्णयाने समाधान व्यक्त होत आहे.