दारू पिण्यास पैसे न दिल्याने हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:52 IST2020-12-04T04:52:46+5:302020-12-04T04:52:46+5:30

पोलीस सूत्रांनुसार, सुधाकर भीमराव भुरमुदे (४३) असे मृताचे नाव आहे. शिरजगावातील अमित जयस्वाल यांच्या दारूभट्टीसमाेरून ते गुजरी बाजारात भाजीपाला ...

Murder for not paying for alcohol | दारू पिण्यास पैसे न दिल्याने हत्या

दारू पिण्यास पैसे न दिल्याने हत्या

पोलीस सूत्रांनुसार, सुधाकर भीमराव भुरमुदे (४३) असे मृताचे नाव आहे. शिरजगावातील अमित जयस्वाल यांच्या दारूभट्टीसमाेरून ते गुजरी बाजारात भाजीपाला आणण्यासाठी निघाले होते. यावेळी गावातीलच सदानंद धाकडे व विजय मंडलिक द आकाश धाकडे यांनी दारू पिण्याकरिता त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्याच्या रागातून आकाश धाकडे याने चाकूने सुधाकर भुरमुदे यांचे शरीरावर सपासप वार केले. यानंतर सर्व जण पळून गेले. गंभीर जखमी अवस्थेत अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरानी मृत घोषित केले.

दरम्यान, ठाणेदार सचिन परदेशी यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आरोपींना पकडण्याकरिता पथक तयार केले. या पथकाने बुधवारी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मनाेज सुरवाडे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Murder for not paying for alcohol