बोराखेडी सरपंचावर गुन्हा दाखल मोताळा

By Admin | Updated: May 7, 2014 23:07 IST2014-05-07T23:07:32+5:302014-05-07T23:07:55+5:30

बोराखेडी येथील सरपंचाने दारुच्या नशेत सार्वजनिक शांतता भंग केल्याबद्दल पोलीसांनी केला गुन्हा दाखल

Motala lodged a complaint against Borachhedi Sarpanch | बोराखेडी सरपंचावर गुन्हा दाखल मोताळा

बोराखेडी सरपंचावर गुन्हा दाखल मोताळा

बोराखेडी सरपंचावर गुन्हा दाखल मोताळा : तालुक्यातील बोराखेडी येथील सरपंच यांनी दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धामधूम करुन शांतता भंग केल्याबद्दल बोराखेडी पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केले आहे. ही घटना ६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. बोराखेडी येथील सरपंच उखर्डा विठ्ठल मोरे (६०) यांनी दारुच्या नशेत तर्रर्र होवून सार्वजनिक ठिकाणी खूप धामधूम केली. आणी आरडा ओरड करुन परिसरातील शांतता भंग केली. त्यांच्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांना खूप मनस्ताप झाला. बोराखेडी पोलीस ठाण्यातील पो. कां. सुनिल शरद मोजे यांच्या तक्रारीवरुन बोराखेडी पोलीसांनी आरोपी सरपंच उखर्डा मोरे यांच्या विरोधात कलम ८५ मु. पो. का. नुसार गुन्हा दाखल करुन अटक केले आहे. पुढील तपास संजय चाफले करीत आहे. सरपंच हा गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कटीबध्द असतो. गावाचे कारभार त्याच्यावर अवलंबून असते. मात्र या गोष्टीची काडीमात्र तमा न बाळगता बोराखेडी येथील सरपंचाने दारुच्या नशेत तर्रर्र होवूत धिंगाणा घातला. त्यामुळे सरपंचावर गुन्हा दाखल होवूत अटक करण्यात आले. या घटनेची परिसरात खमंग चर्चा सुरु आहे.

Web Title: Motala lodged a complaint against Borachhedi Sarpanch