शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत मोपेडस्वार ठार

By admin | Updated: May 26, 2015 02:35 IST

बेताल वाहतुकीचा अकोला शहरात पुन्हा एक बळी.

अकोला: रेतीने भरलेल्या भरधाव ट्रकने समोरील मोपेडस्वारास जबर धडक दिल्याने, मोपेडस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास नेहरू पार्क चौकात घडली. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून फरार झाला. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुने शहरातील गोडबोल प्लॉटमध्ये राहणारे चंद्रकांत अनंतराव जोशी (५२) हे सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांच्या एमएच २८ जी ७0३८ क्रमांकाच्या लुनाने नेहरू पार्क चौकाकडून जात होते. दरम्यान, त्यांच्या मागाहून एमटीव्ही २२५0 क्रमांकाच्या रेतीने भरलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या मोपेडला जबर धडक दिली. एवढेच नाहीतर ट्रकची चाके त्यांचे डोके व चेहर्‍यावरून गेल्याने चंद्रकांत जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. जोशी यांचा चेहरा छिन्नविछिन्न झाल्यामुळे ओळखूही येत नव्हता. जोशी यांना धडक दिल्यानंतर अनियंत्रित झालेल्या ट्रकचालकाने समोरून येणार्‍या ट्रकलाही धडक दिली. यात त्या ट्रकच्या समोरील भाग क्षतिग्रस्त झाला. सिव्हिल लाइन पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मोपेड व ट्रक ताब्यात घेतला. मेहरेनगरातील विजय मधुसुदन डांगे यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३0४ (अ) व १८४ नुसार गुन्हा दाखल केला. चंद्रकांत जोशी यांची पत्नी खंडेलवाल प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करतात. त्यांना एक मुलगी असून, ती कोपरगाव येथे अभियांत्रिकीला शिकते. माजी नगरसेवक विलास शेळके यांच्याकडे जोशी सुपरवायझर म्हणून काम करायचे. मंगळवारी दुपारी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.