शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाइल अप्लिकेशन’द्वारे मिळणार ‘जलयुक्त’ कामांची माहिती

By admin | Updated: May 21, 2015 01:44 IST

कामांचे फोटो घेण्याचे काम सुरू

अकोला: शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यात सुरू असलेल्या कामांची माहिती आता ह्यमोबाइल अप्लिकेशनह्णद्वारे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांचे फोटो काढण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून १८ मे पासून सुरू करण्यात आले आहे. शासनामार्फत ह्यजलयुक्त शिवार अभियानह्ण राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेली कामे, पूर्ण झालेली कामे यासंदर्भात प्रशासनासह नागरिकांना कामांची माहिती तातडीने उपलब्ध व्हावी, तसेच ह्यजलयुक्त शिवारह्णच्या कामांमध्ये पारदर्शकता असावी, यासाठी ह्यमोबाइल अप्लिकेशनह्णचा वापर करण्यात येत आहे. जलसंधारण विभागाच्या शासन निर्णय ५ डिसेंबर २0१४ मधील मुद्दा क्र.२२ अभियानाची फलनिष्पत्ती, यामध्ये ह्यजीपीएस मॉनिटरिंगह्णबाबत नूमद करण्यात आले आहे. त्यानुषंगाने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरू करण्यात आलेल्या कामांची भौगोलिक माहिती व फोटो प्रणालीद्वारे नोंद घेण्यासाठी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन (एमआरएसएसी) या संस्थेच्या माध्यमातून ह्यमोबाइल अप्लिकेशनह्ण विकसित करण्यात आले असून, या प्रणालीचा कार्यक्षेत्रावर प्रत्यक्ष वापर करण्याचे निर्देश शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागामार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणांना २८ एप्रिल रोजीच्या पत्राद्वारे देण्यात आले. मोबाइल अप्लिकेशनद्वारे घेण्यात आलेल्या कामाची माहिती ह्यजलयुक्तह्ण संकेतस्थळावर पाठविली जाणार आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांचे फोटो घेण्याचे काम संबंधित यंत्रणाकडून १८ मे पासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोबाइल अप्लिकेशनद्वारे शासनाच्या जलयुक्त संकेतस्थळावर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामांची भौगोलिक स्थिती व फोटोसह माहिती नागरिकांना उपलब्ध होणार आहे.