शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

आमदारांनी उपटले कान; कॅनॉल रोडच्या मोजणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:39 PM

लोकप्रतिनिधींनी कर्तव्याची जाणीव करून देताच दोन्ही विभागांनी धावपळ करीत दुपारी १२.३० वाजता कॅनॉल रोडच्या मोजणीला सुरुवात केली.

अकोला: जुने शहरातील कॅनॉल रोडच्या शासकीय मोजणीला येत्या १२ मार्च रोजी एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना मोजणी प्रक्रियेला खीळ बसण्यासोबतच महापालिका व भूमी अभिलेख विभागाच्या यंत्रणेने खेळखंडोबा चालविल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच शुक्रवारी सकाळी आमदार रणधीर सावरकर यांनी दोन्ही प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपटले. लोकप्रतिनिधींनी कर्तव्याची जाणीव करून देताच दोन्ही विभागांनी धावपळ करीत दुपारी १२.३० वाजता कॅनॉल रोडच्या मोजणीला सुरुवात केली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत एक किलोमीटर अंतराची मोजणी करण्यात आली होती.जुने शहरातील डाबकी रोड ते जुना बाळापूर नाका ते थेट राष्ट्रीय महामार्गावरील नवीन किराणा मार्केटपर्यंत ३ हजार ४०० मीटर लांब कॅनॉल रोडचे निर्माण करणे आवश्यक झाले आहे. कॅनॉलच्या शासकीय मोजणीसाठी मनपा प्रशासनाने जानेवारी २०१८ मध्ये भूमी अभिलेख विभागाकडे ७ लाख ८४ हजार रुपये शुल्क जमा केले होते. त्यानंतर या विभागाने १२ मार्च २०१८ पासून कॅनॉलच्या मोजणीला सुरुवात केली. या मोजणीदरम्यान येणारे अडथळे दूर करण्याची जबाबदारी महापालिकेच्या नगररचना विभाग, अतिक्रमण विभागाची असताना या दोन्ही विभागांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे एक वर्षाचा कालावधी होत असला तरी कॅनॉलची मोजणी अर्धवट स्थितीत असल्याचे समोर आले. याप्रकरणी महापालिका व भूमी अभिलेख विभागाने आपसात समन्वय साधणे अपेक्षित असताना दोन्ही विभागांकडून मोजणीसाठी टाळाटाळ केली जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत आमदार रणधीर सावरकर यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस तसेच भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांना तातडीने ही मोजणी प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.शुक्रवारी काय घडले?मनपाचे अतिक्रमण विभाग प्रमुख राजेंद्र टापरे तसेच भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी धावपळ करीत ६ मार्च रोजी डाबकी रोड पोलीस ठाणे गाठून पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. पोलिसांनी सहकार्य केल्यानंतर शुक्रवारी मोजणी करण्याचे ठरले; परंतु ऐन वेळेवर मोजणीसाठी लागणारे उपकरण उपलब्ध नसल्याचे सांगत भूमी अभिलेख विभागाने कर्तव्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न क रताच मनपा कर्मचाऱ्यांनी भूमी अभिलेख विभागात धाव घेतली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका